मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात… त्या जागेमुळे नेत्याने खदखद बाहेर काढली!
पुणे विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा निर्णय म्हणजे विश्वासघात असल्याचं म्हटलं आहे.
पुणे विधानपरिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी ऐनवेळी माघार घेतल्यानंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी हा निर्णय म्हणजे विश्वासघात असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी सांगितलं की, पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी काँग्रेस पक्षाची ताकद सर्वाधिक होती आणि ही जागा काँग्रेसने लढवावी अशी पक्षाची भूमिका होती.
प्रशांत जगताप यांनी सांगितलं की, महाविकास आघाडीतील जागावाटपावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे आणि सातारा या 2 जागांची मागणी केली होती. त्यामुळे काँग्रेसने मोठ्या मनाने पुण्याची जागा राष्ट्रवादीला सोडली. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
काही महिन्यांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसमधून काँग्रेसमध्ये आलेल्या प्रशांत जगताप यांनी या निर्णयावर उघडपणे टीका केली. दरम्यान, श्रीकांत पाटील यांनी माघार घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रम काकडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग आता मोकळा झाला आहे.
Published on: Jun 04, 2026 06:10 PM
बंडखोरांना गिरीश महाजनांचा थेट इशारा; कारवाई अटळ म्हणत दिला मोठा संदेश
मविआमध्ये मोठी खळबळ! राष्ट्रवादी शरद पवार गटाने विश्वासघात...
त्या हॉटेलमध्ये 150 कोटींचा व्यवहार अन्... उमेदवारांच्या ऐनवेळी माघारी
महागाईने कंबरडं मोडलं... ठाकरे गटाचा विलेपार्ल्यात सरकारवर हल्लाबोल

