बलात्काऱ्यांना 21 दिवसांच्या आत फाशी, आंध्रप्रदेश सरकारचा मोठा निर्णय

| Updated on: Dec 13, 2019 | 9:19 PM

महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्रप्रदेश विधानसभेत नुकतंच 'दिशा विधेयक' मंजूर करण्यात आले. या विधेयकांतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची  शिक्षा दिली जाणार (Andhra Pradesh Disha Bill 2019 Passed) आहे

बलात्काऱ्यांना 21 दिवसांच्या आत फाशी, आंध्रप्रदेश सरकारचा मोठा निर्णय
Follow us on

हैद्राबाद : महिलांच्या सुरक्षेसाठी आंध्रप्रदेश विधानसभेत नुकतंच ‘दिशा विधेयक’ मंजूर करण्यात (Andhra Pradesh Disha Bill 2019 Passed) आले. या विधेयकातंर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपीला 21 दिवसांमध्ये फाशीची  शिक्षा दिली जाणार (Andhra Pradesh Disha Bill 2019 Passed) आहे. नुकतंच आंध्रपप्रदेश विधानसभेत ‘दिशा विधेयक 2019’ मंजूर करण्यात आले. दरम्यान यामुळे आंध्रप्रदेश हे बलात्काऱ्यांना फाशीची शिक्षा देणारे देशातील पहिले राज्य ठरले (Andhra Pradesh Disha Bill 2019 Passed) आहे.

तेलंगाणामध्ये महिला डॉक्टरसोबत बलात्कार आणि हत्येनंतर संपूर्ण देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. यातील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणीही अनेकांकडून करण्यात येत होती. यानंतर आंध्रप्रदेश सरकारने महिलांच्या सुरक्षेसाठी नवा कायदा आणला आहे.

भारतीय कायद्यामध्ये बलात्काराच्या आरोपात दोष सिद्ध झाल्यानंतर फाशीच्या शिक्षेची तरतूद अद्याप करण्यात आलेली नाही. दिशा विधेयक मंजूर झाल्यानंतर आता आंध्रप्रदेश गुन्हे कायद्यात सुधारणा करण्यात येणार आहे. तसंच याला ‘आंध्रप्रदेश दिशा कायदा’ असे नाव देण्यात आलं (Andhra Pradesh Disha Bill 2019 Passed) आहे.

नवीन कायद्यानुसार बलात्कारासारख्या गंभीर गुन्ह्यांचा तपास सात दिवसात पूर्ण करावा लागणार आहे. याशिवाय खटलाही 14 दिवसात पूर्ण करुन 21 दिवसात गुन्हेगारांना फाशीची शिक्षा देण्याची तरतूद आहे.

तसेच महिला आणि लहान मुलांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांसाठी विशेष न्यायालयाची स्थापना करण्यासाठी मंजूरी देण्यात आली आहे. यानुसार महिला आणि बालकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये खटला चालवण्यासाठी विशेष न्यायालयाची स्थापनाही करण्यात येणार आहे. यापूर्वी बुधवारी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डींच्या नेतृत्वात विधानसभेत दिशा बिल मंजूर करण्यात आले (Andhra Pradesh Disha Bill 2019 Passed) होते.

बलात्काऱ्यांना 21 दिवसांत शिक्षा

आंध्रपद्रेश दिशा कायदा अंतर्गत बलात्काराचा आरोप सिद्ध होणाऱ्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात येणार आहे. या कायद्यातंर्गत 7 दिवसांमध्ये तपास पूर्ण करावा आणि 14 दिवसांत न्यायालयात खटला चालवण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 21 दिवसांमध्ये आरोपीला शिक्षा ठोठावण्यात येणार आहे. सध्या या कायद्यानुसार खटला चालवण्यासाठी 4 महिन्यांचा वेळ मिळतो.