‘कोरोना व्हायरस’ हा केमिकल हल्ला, गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा

| Updated on: Feb 16, 2020 | 1:10 PM

सध्या केमिकल हल्ले, बायोलॉजिकल हल्ले होत आहेत. त्यातच कोरोनाच्या माध्यमातून नवीन केमिकल शस्त्र पुढे आल्याचं मत अनिल देशमुखांनी व्यक्त केलं.

कोरोना व्हायरस हा केमिकल हल्ला, गृहमंत्री अनिल देशमुखांचा दावा
Follow us on

पुणे : ‘कोरोना व्हायरस’ हा एक प्रकारचा केमिकल हल्ला आहे, असा दावा करत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी खळबळ उडवली आहे. कोरोनाच्या माध्यमातून नवीन केमिकल शस्त्र पुढे आल्याचं अजब वक्तव्यही (Anil Deshmukh on Coronavirus) त्यांनी केलं.

नवनव्या तंत्रज्ञानाचा वापर करुन सध्या हल्ले करण्यात येत आहेत. 2018 मध्ये ड्रोनच्या माध्यमातून व्हेनेझुएलाच्या अध्यक्षांवर हल्ला करण्यात आला होता. सध्या केमिकल हल्ले, बायोलॉजिकल हल्ले होत आहेत. त्यातच कोरोनाच्या माध्यमातून नवीन केमिकल शस्त्र पुढे आल्याचं मत अनिल देशमुखांनी व्यक्त केलं.

सध्या जगापुढे मोठं संकट बनून उभा असलेला ‘कोरोना व्हायरस’ हा एक प्रकारचा केमिकल हल्ला असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केल्यामुळे भुवया उंचावल्या आहेत.

पुण्यात साहित्य कलाप्रसारणी सभेच्या वतीने मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी घेतलेल्या मुलाखतीत गृहमंत्री अनिल देशमुखांनी हा दावा केला. या दाव्यात कितपत तथ्य आहे, हे अद्याप समजलेलं नाही.

कोरोना व्हायरसने जगात अनेकांचे बळी घेतले आहेत. चीनपासून उगम झालेल्या या विषाणूने पूर्व आशियाई देशांना कह्यात घेतलं (Anil Deshmukh on Coronavirus) आहे.