कंपाऊंडरच्या पोटात चाकू खुपसला, दवाखाना बंद करुन पलायन, येवला पोलीस अज्ञात हल्लेखोराच्या शोधात

| Updated on: Nov 09, 2020 | 10:58 AM

शिवाजी पैठणकर काही उत्तर देतील त्यापूर्वीच या हल्लेखोराने अचानक त्यांच्या पोटात चाकू खुपसला आणि रुग्णालयातून पळ काढत बाहेरचं दार बंद केलं.

कंपाऊंडरच्या पोटात चाकू खुपसला, दवाखाना बंद करुन पलायन, येवला पोलीस अज्ञात हल्लेखोराच्या शोधात
Follow us on

नाशिक : येवला तालुक्यातील अंदरसूल येथे आज सकाळी सात वाजेच्या दरम्यान (Attack On Compounder) धक्कादायक प्रकार घडला आहे. खासगी रुग्णालयात डॉक्टर कुठे आहे, हे विचारण्याच्या बहाण्याने कंपाउंडरवर अज्ञात हल्लेखोराने चाकू हल्ला केला आहे. या घटनेमुळे अंदरसूल गावात एकच खळबळ उडाली आहे (Attack On Compounder).

आज (9 नोव्हेंबर) सकाळी सात वाजेच्या दरम्यान येवला तालुक्यातील अंदरसूल येथे डॉक्टर राजे भोसले या खासगी रुग्णालयात कंपाउंडर म्हणून कामाला असलेला शिवाजी पैठणकर याच्यावर अज्ञात हल्लेखोराने चाकू हल्ला केल्याची घटना घडली आहे. पेशंट म्हणून हा हल्लेखोर रुग्णालयात आला. कंपाउंडर शिवाजी पैठणकर यांनी त्याची विचारणा केली. तेव्हा डॉक्टर कुठे आहे, असं या हल्लेखोराने विचारल. मात्र, शिवाजी पैठणकर काही उत्तर देतील त्यापूर्वीच या हल्लेखोराने अचानक त्यांच्या पोटात चाकू खुपसला आणि रुग्णालयातून पळ काढत बाहेरचं दार बंद केलं.

याची माहिती ग्रामस्थांना मिळताच ग्रामस्थांनी रुग्णालयाकडे धाव घेतली. मात्र, हा अज्ञात हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाला आहे. याप्रकरणी येवला तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठत कंपाउंडर शिवाजी पैठणकर यांच्याकडून माहिती घेऊन परिसरात नाकेबंदी केली आहे. या अज्ञात हल्लेखोराचा पोलीस कसूर शोध घेत आहे.

कंपाउंडर शिवाजी पैठणकर याच्यावर अज्ञात हल्लेखोरांने चाकूहल्ला केल्याचे कारण अस्पष्ट असल्याने येवला तालुका पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.

Attack On Compounder

संबंधित बातम्या :

घरात कोणी नसल्याची संधी साधत चोरीचा डाव, 38 लाखांचा ऐवज लंपास

प्रेयसीला गाडीवर फिरवायचं आहे, भाच्याकडून मावशीचे दागिने लंपास