औरंगाबाद : कोरोनाबाधित महिलेची यशस्वी झुंज, सात दिवसांनी कोरोनावर मात

| Updated on: Mar 24, 2020 | 5:13 PM

औरंगाबादमधील एकमेव कोरोनाबाधित 59 वर्षीय महिला (Auranagabad Corona Patient) आता ठणठणीत बरी झाली आहे. तिला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे.

औरंगाबाद : कोरोनाबाधित महिलेची यशस्वी झुंज, सात दिवसांनी कोरोनावर मात
Follow us on

औरंगाबाद : जगभरात थैमान घालणारा कोरोना राज्यातही वाढत चालला आहे. राज्यात कोरोनाबाधित रुगंणांचा आकडा 100 च्या वर गेला आहे. या आजारावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार आणि प्रशासन प्रचंड मेहनत घेत आहे. त्यांच्या याच प्रयत्नांना सकारात्मक यश मिळताना दिसत आहे. औरंगाबादमधील एकमेव कोरोनाबाधित 59 वर्षीय महिला (Auranagabad Corona Patient) आता ठणठणीत बरी झाली आहे. तिला लवकरच डिस्चार्ज मिळणार आहे. या महिलेवर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते (Auranagabad Corona Patient).

औगंरगाबादमध्ये कोरोनाबाधित महिला आढळल्याची माहिती समोर येताच शहरातील प्रत्येक व्यक्ती धास्तावली होती. जगभर दाणादाण उडवणार एक आजार आज आपल्या आसपास घोंगवतो आहे. या विचाराने प्रत्येक औरंगाबादकर घाबरुन गेला होता आणि प्रत्येकाच्या मनात एकच विचार घोंगावत होता की, आता पूढे काय होणार? पण सुदैवाने पुढची सगळी संकट हातोहात टळली आहेत.

आरोग्यमंत्र्यांकडून समाधान व्यक्त

राज्यातील 15 कोरोनाबाधितांची प्रकृती सुधारली असून त्यांना लवकरच डिस्चार्ज मिळणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी दिली. जगभरात कोरोना थैमान माजवत असताना राज्यातील 15 रुग्ण बरे होत आहेत ही एक समाधानाची बाब असल्याचं राजेश टोपे म्हणाले. त्यामुळे राज्यातील नागरिकांनी घाबरुन जाण्याची आवश्यकता नाही. कोरोनापासून माणूस बरा होऊ शकतो. फक्त आपण काळजी घेतली पाहिजे, असं आवाहन राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी केलं.

“औरंगाबादमध्ये 1, मुंबईमध्ये 12, पुण्यात 2 अशा एकूण 15 जणांना डस्चार्ज दिला जाऊ शकतो. ही एक समाधानाची बाब आहे. यातून बरे होता येतं. आज 106 अॅडमिट आहेत. त्यातील 2 आयसीयूमध्ये आहेत. तर इतर सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे”, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.

संबंधित बातम्या : तब्बल 15 जण डिस्चार्जच्या वाटेवर, राजेश टोपेंची महाराष्ट्राला गुड न्यूज