औरंगाबादेत 7 वर्षीय चिमुरडीचा लढा यशस्वी, 7 दिवसात कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह

| Updated on: Apr 13, 2020 | 12:27 PM

एका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या सात वर्षाच्या चिमुरडीचे कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह (Aurangabad child defect Corona Virus) आले आहेत.

औरंगाबादेत 7 वर्षीय चिमुरडीचा लढा यशस्वी, 7 दिवसात कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह
Follow us on

औरंगाबाद : राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत (Aurangabad child defect Corona Virus) आहेत. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या 1 हजार 982 वर पोहोचली आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमधील एका सात वर्षीय चिमुरडीने कोरोना विरुद्ध यशस्वी लढा दिला आहे. एका खाजगी रुग्णालयात कोरोनावर उपचार घेत असलेल्या सात वर्षाच्या चिमुरडीचे कोरोनाचे दोन्ही रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.

औरंगाबादमध्ये एका सात वर्षीय (Aurangabad child defect Corona Virus) चिमुरडीने कोरोना विरोधातील लढा यशस्वीरित्या दिला आहे. या चिमुरडीचा रिपोर्ट सात दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर या मुलीवर धूत रुग्णालयात उपचार सुरु होते. यानंतर 7 दिवसानंतर या मुलीचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. विशेष म्हणजे औरंगाबादमधील धूत रुग्णालयाने आतापर्यंत दोघांवर यशस्वी उपचार केले आहेत.

यापूर्वी यात रुग्णालयात उपचार घेत असलेली एका 59 वर्षीय महिलाही कोरोनामुक्त झाली होती. यानंतर आता सात वर्षीय मुलीने कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

दरम्यान कल्याणमध्ये एका सहा महिन्याच्या बाळाने कोरोनावर मात केली होती. कोरोनाला हरवून जेव्हा हे बाळ परत आपल्या घरी आलं तेव्हा शेजाऱ्यांनी त्याचं जंगी स्वागत केलं. टाळ्या,थाळ्या आणि शिट्या वाजवत आसपासच्या सोयायटीमधील नागरिकांनी त्या बाळाचं स्वागत केलं.

याप्रसंगी बाळाची आई अत्यंत खुश होती. तिने बाळाचा हात वर करत सर्वाचे आभार मानले. यावेळी पोलीस, डॉक्टर आणि रुग्णावाहिका चालक यांच्यासाठीही नागरिकांनी टाळ्या (Aurangabad child defect Corona Virus) वाजवल्या.

 संबंधित बातम्या : 

धारावीत आणखी चौघांना कोरोनाची लागण, कोणत्या परिसरात किती रुग्ण?

सांगलीतील व्यक्तीचा रिपोर्ट मुंबईत पॉझिटिव्ह, डॉक्टर, ड्रायव्हरसह 24 जण क्वारंटाईन