‘मोदी किती चांगले आहेत’, ऑस्‍ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे सेल्‍फी शेअर करत गौरवोद्गार

| Updated on: Jun 29, 2019 | 2:29 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी जी20 शिखर संमेलनासाठी 2 दिवस ओसाकामध्ये असणार आहेत. आज त्यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांच्यासोबत बैठक झाली.

‘मोदी किती चांगले आहेत’, ऑस्‍ट्रेलियाच्या पंतप्रधानांचे सेल्‍फी शेअर करत गौरवोद्गार
Follow us on

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी जी20 शिखर संमेलनासाठी 2 दिवस ओसाकामध्ये असणार आहेत. आज त्यांची ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी भारत आणि ऑस्ट्रेलियामधील मजबूत संबंधांवर दोघांनीही चर्चा केली.

या मुलाखतीनंतर ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मोरिसन यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो शेअर केला. मोदींसोबतचा फोटो शेअर करताना त्यांनी असं काही कॅप्शन दिलं की सोशल मीडियात त्याची जोरदार चर्चा झाली. त्यांनी लिहिले, “मोदी किती चांगले आहेत.”

या फोटोत दोन्ही देशांचे पंतप्रधान मोकळेपणाने हसताना चेष्टा मस्करीही करताना दिसत आहेत. यावेळी जागतिक पातळीवर दोघांचीही मोठ्या कालवधीनंतर भेट झाली. ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांना उत्तर देताना मोदी म्हणाले, “मेट मी आपल्या दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांमधील ऊर्जेविषयी विचार करत आहे.”

जपानमधील ओसाकात सुरु असलेल्या जी-20 संमेलनात इतर BRICS नेत्यांसह देखील बैठक झाली. यात चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला. दक्षिण आफ्रिका आणि ब्राझिलचे राष्ट्रपतीही या बैठकीत हजर होते.

बैठकीत मोदींनी ब्रिक्स नेत्यांना सांगितले, “दहशतवाद फक्त निरागस लोकांचेच बळी घेत नाही, तर आर्थिक विकास आणि धार्मिक सद्भावनेलाही प्रभावित करतो. आपल्याला दहशतवाद आणि वंशवादाचे समर्थन करणाऱ्यांना रोखायचे आहे.” यावेळी मोदींनी सौदी अरबचे क्राउन प्रिंस मोहम्मद बिन सलमान, कोरियाचे राष्ट्रपती आणि जर्मन चांसलर यांच्यासोबतही द्विपक्षीय चर्चा केली.