सावकारीविरोधात बारामती पोलिसांचा जब्बर प्लान, शहरात रिक्षा फिरवत थेट तक्रारीचं आवाहन

| Updated on: Nov 07, 2020 | 5:46 PM

पोलिसांच्या या आवाहनानंतर शहर पोलीस ठाण्यात एका सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे.

सावकारीविरोधात बारामती पोलिसांचा जब्बर प्लान, शहरात रिक्षा फिरवत थेट तक्रारीचं आवाहन
Follow us on

बारामती : बारामती (Baramati) शहरात सावकारीविरोधात (money laundering ) पोलिसांनी (Police) कडक पावलं उचलली आहे. शहरात चक्क रिक्षा फिरवून सावकारांविरोधात तक्रारी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. त्यामुळं शहर आणि परिसरातील सावकारांचं धाबे दणाणले आहेत. दरम्यान, पोलिसांच्या या आवाहनानंतर शहर पोलीस ठाण्यात एका सावकारावर गुन्हा दाखल झाला आहे. (Baramati Police action against money laundering Appeal for complaint against moneylenders )

मागील काही दिवसांत बारामतीत अवैध सावकारीचा कळस झाला आहे. त्यामुळं शहरात नव्याने रुजू झालेल्या पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सावकारांविरोधात कठोर भूमिका घेत शहरातून रिक्षा फिरवत नागरिकांना पोलीस त्यांच्यासोबत असल्याबाबत आश्वस्त केलं आहे. त्याचवेळी सावकारांच्या विरोधात तक्रारी करण्याचं आवाहनही केलं आहे. दरम्यान, या आवाहनानंतर एका सावकारावर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे,

बारामतीत काही दिवसांपूर्वी एका व्यापाऱ्याने सावकारीच्या त्रासापायी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. या प्रकरणात अनेक दिग्गजांचे लागेबांधे असल्याचे बोललं जातं आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सावकारांविरोधात कठोर कारवाईचं धोरण अवलंबलं आहे. त्यामुळंच शहरात ठिकठिकाणी रिक्षा फिरवत सावकारांविरोधात तक्रारी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

दरम्यान, पोलिसांनी सावकारांविरोधात घेतलेल्या या भूमिकेचं नागरिकांनी स्वागत केलं आहे. परंतु, असं असलं तरी या कारवाईत सातत्य राहणार की तो केवळ फार्स ठरणार हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

इतर बातम्या – 

आमदारकीसाठी अनेकजण इच्छुक, सर्वांचीच इच्छा आम्ही पूर्ण करु शकत नाही : जयंत पाटील

शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, उदय सामंत यांचा निशाणा

(Baramati Police action against money laundering Appeal for complaint against moneylenders )