AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, उदय सामंत यांचा निशाणा

शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद आहे. राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी लगावला.

शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद, त्यांनी आत्मपरीक्षण करावं, उदय सामंत यांचा निशाणा
Akshay Adhav
Akshay Adhav | Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:58 PM
Share

सिंधुदुर्ग : कोकणात शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही, असा दावा करणाऱ्या भाजप नेते नारायण राणेंचा (Narayan Rane) उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, शिवसेना नेते उदय सामंत (Uday Samant) यांनी समाचार घेतलाय. कोकणात शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा विनोद आहे. राणेंना सध्या आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे, असा टोला उदय सामंत यांनी लगावला. (Uday Samant Criticized Narayan Rane)

“आम्ही सर्व तीन-चारदा निवडून आलेलो शिवसेनेचे लोकप्रतिनिधी आहोत. आम्ही पराभव कधीच पाहिला नाही. राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक घ्यायचं हे भाजपचं आव्हान आमच्यासाठी फार छोटं आणि कमकुवत आव्हान आहे”, असं म्हणत उदय सामंत यांनी राणेंना ललकारलं.

“आम्हाला आव्हान देणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. एकदा पराभव ठीक आहे, दोनदा-तीनदा पराभव होतो. कोकणवासियांनी ज्यांना नाकारलं त्यांच्याबद्दल बोलून त्यांना मला मोठं करायचं नाही”, असा टोमणाही त्यांनी राणेंना लगावला.

पुढे बोलताना उदय सामंत म्हणाले, “कोकणात यानंतर शिवसेनेचा एकही आमदार निवडून येणार नाही हा राणेंचा फार मोठा विनोद आहे. मी सर्वसामान्य ग्रामपंचायत सदस्यांनाही हलक्यात घेत नाही ,राणेंना तर घेणारच नाही”.

पत्रकारांनी उदय सामंत यांनी माजी मंत्री दीपक केसरकर यांच्या नाराजीबाबत विचारलं. यावर बोलताना ते म्हणाले, “जिल्ह्याला मंत्रीपद मिळावं अशी प्रत्येकाची भावना असते. त्यामुळे केसरकरांचं म्हणणं वावग आहे असं मला वाटत नाही”. दीपक केसरकरांची नाराजी दूर करणार काय? या प्रश्नाला मात्र त्यांनी बगल देऊन उत्तर दिलं.

“मला पालकमंत्री पद मिळालं म्हणून केसरकर नाराज नाहीत. पालकमंत्री म्हणून त्यांनी चांगलं काम केलं आहे. इतिहासात कोणी निधी आणला नाही तेवढा निधी केसरकरांनी आणला. त्यामुळे आमच्यासाठी ते आदरणीय आहेत. दीपकभाई ज्येष्ठ आहेत, त्यामुळे त्यांना माझा कान धरण्याचा अधिकार आहे”, असंही ते म्हणाले.

(Uday Samant Criticized Narayan Rane)

संबंधित बातम्या

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार; नारायण राणेंची गर्जना

नारायण राणेंनी नसती स्वप्नं पाहू नयेत, शिवसेनची स्पर्धा करण्याचे तुमचे दिवस कधीच गेले; विनायक राऊतांचा हल्लाबोल

Follow Us
टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
Tiger Shroff : टायगर श्रॉफच्या प्रकरणाला वेग; आरोपींना थेट राजस्थानच्या कोटात...
टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्
Tiger Shroff Case : टायगर श्रॉफ प्रकरणात मोठी अपडेट समोर; बाईक अंधेरीत पार्क, ट्रेनने पळाले अन्.....
राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी...
Jitendra Awhad : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांना जीवे मारण्याची धमकी; फोन करणारा कोण?
प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट....
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाला नवं वळण; आगरी-कोळी संघटनांची थेट गणेश नाईकांकडे धाव
मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात...
Manoj Jarange : Dasara Melava : मनोज जरांगेंच्या दसरा मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात, जरांगे पाटील उद्या काय बोलणार? महाराष्ट्राचं लक्ष
टायगर श्रॉफला भेटले मात्र...; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
Ram Purneker On Tiger Shroff Car : टायगर श्रॉफला भेटले मात्र आमच्यासाठी वेळ नाही; राम पूर्णेकरांचा एकनाथ शिंदेंवर संताप
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी...
राहुल बोंद्रे यांच्या अडचणी वाढल्या! शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान;
पुणे शिक्षक मतदारसंघात कौस्तुभ गावडेंचे विरोधकांना खुले आव्हान; म्हणाले...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी...
वाशिममध्ये दुष्काळाचा कहर! पाण्याअभावी हळदीचे पीक वाळले, शेतकरी हतबल
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मतमोजणीला सुरुवात, महायुतीची आघाडी