नारायण राणेंनी नसती स्वप्नं पाहू नयेत, शिवसेनची स्पर्धा करण्याचे तुमचे दिवस कधीच गेले; विनायक राऊतांचा हल्लाबोल

शिवसेनेला विसर्जित करण्याच्या 'डराव डराव'च्या घोषणा यापूर्वी अनेकेवळा देण्यात आल्या. | Vinayak Raut

नारायण राणेंनी नसती स्वप्नं पाहू नयेत, शिवसेनची स्पर्धा करण्याचे तुमचे दिवस कधीच गेले; विनायक राऊतांचा हल्लाबोल
Follow us
| Updated on: Nov 04, 2020 | 7:16 PM

सिंधुदुर्ग: शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याची भाषा करणारे भाजप खासदार नारायण राणे (Narayan Rane) यांना विनायक राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. स्वतःचा पक्ष एका वर्षाच्या आत बरखास्त करण्याची वेळ ओढावलेल्या नारायण राणे यांनी शिवसेनेला घरी बसवण्याची स्वप्न बघू नयेत, असा टोला विनायक राऊत यांनी लगावला. (Shivsena MP Vinayak Raut slams bjp leader Narayan Rane)

नारायण राणे यांनी मंगळवारी झालेल्या पत्रकारपरिषदेत आगामी निवडणुकीत शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार, अशी गर्जना केली होती. सध्या कोकणात शिवसेनेचे 11 आमदार आहेत. पुढच्या निवडणुकीत या सर्व आमदारांना घरी बसवण्यात येईल, असे नारायण राणे यांनी म्हटले होते. त्यांच्या या टीकेला शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले. शिवसेनेला विसर्जित करण्याच्या ‘डराव डराव’च्या घोषणा यापूर्वी अनेकेवळा देण्यात आल्या. मात्र, ते शक्य झाले नाही. मुळात नारायण राणे यांनी असं स्वप्नचं पाहू नये. कारण, शिवसेनेशी स्पर्धा करण्याचे नारायण राणे यांचे दिवस कधीच निघून गेले आहेत, असे विनायक राऊत यांनी म्हटले.

हिंमत असेल तर 2024मध्ये कोकणातून लढा; शिवसेनेचं चॅलेंज

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या नारायण राणेंनी येत्या 2024 च्या निवडणूक रिंगणात उतरावं. शिवसेना काय आहे तुम्हाला कळेलच. शिवसेनेने यापूर्वी 2014 साली नारायण राणे यांचे आव्हान मोडून काढले होते. विधानसभेतही त्यांचा पराभव माझ्यासारख्या शिवसैनिकांनी केलाच. पण त्यानंतर त्यांचा मुलाचाही दोन वेळा सलग पराभव शिवसेना आणि कोकणातील जनतेनं केला आहे, असा टोला शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी लगावला आहे.

काय म्हणाले होते नारायण राणे?

कोकणातील शिवसेनेच्या 11 आमदारांना पुढच्या निवडणुकीत घरी बसवण्यात येतील. त्यामुळे आता 56 आमदार घेऊन फिरणाऱ्या शिवसेनेची संख्या कमी होईल, असा दावाही नारायण राणे यांनी केला. शिवसेनेचे 145 आमदार निवडून आलेले नाहीत आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नाहीत. त्यामुळे तुमचे आमदार किती असं त्यांना लोक विचारतील. त्यामुळेच ते पिंजऱ्यातून बाहेर पडत नाहीत, अशी टीका नारायण राणे यांनी केली होती. संबंधित बातम्या:

2019 च्या निवडणुकीतून पळ काढणाऱ्या राणेंनी 2024 ला रिंगणात उतरावं, शिवसेनेचं चॅलेंज

शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार; नारायण राणेंची गर्जना

(Shivsena MP Vinayak Raut slams bjp leader Narayan Rane)

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.