ऊस आणि हळदीचा अनोखा विवाह सोहळा

| Updated on: Jan 16, 2020 | 1:38 PM

जिल्ह्यातील धरूर तालुक्यात ऊस आणि हळदीचं लग्न लावण्याची अनोखी परंपरा आहे. यंदादेखील मकर संक्रांतीच्या दिवशी हे लग्न पंचक्रोशीतील वऱ्हाडी मंडळीच्या उपस्थितीत पार पडलं. या अनोख्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा असते.

ऊस आणि हळदीचा अनोखा विवाह सोहळा
Follow us on

बीड : जिल्ह्यातील धारुर तालुक्यात ऊस आणि हळदीचं लग्न लावण्याची अनोखी परंपरा आहे (Sugarcane and Turmeric Wedding). यंदादेखील मकर संक्रांतीच्या दिवशी हे लग्न पंचक्रोशीतील वऱ्हाडी मंडळींच्या उपस्थितीत पार पडलं. या अनोख्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा असते. धारुर येथे ऊस आणि हळदीचा विवाह लावण्याची अनोखी परंपरा गेली अनेक वर्षांपासून जपली जाते. मकर संक्रातीचा सण हा महिलांसाठी विशेष मानला जातो. यावेळी वाण देण्याची परंपरा आहे. याच सणाच्या दिवशी धारुर येथे ऊस आणि हळदीचं मोठ्या थाटात लग्न पार पडते. ऊस आणि हळद असलेल्या शेतात हे लग्न पार पडतं. यावेळी वऱ्हाडी मंडळी, बँड बाजा असं सर्व असतं (Sugarcane and Turmeric Wedding).

भगवान शंकरांनी जेव्हा मल्हारीचा अवतार घेतला, त्यावेळी म्हाळसा हिमालय येथे तपश्चर्येसाठी बसली होती. बारा वर्ष तपश्चर्या केल्यानंतर तिला पिवळी वनस्पती प्राप्त झाली. ती पिवळी वनस्पती म्हणजे हळद आणि याच हळदीला अंगाला लावून तिने भगवान शंकरासोबत लग्न करण्याची इच्छा प्रकट केली. तेव्हा भगवान शंकराने तिला वचन दिलं, जेव्हा मी मल्हारीचा अवतार धारण करेन, तेव्हा तू माझी पत्नी असशील. हे वचन भगवान शंकराने म्हाळसासोबत मकर संक्रांतीच्या दिवशी लग्न करून पूर्ण केलं, अशी या लग्नाची आख्यायिका सांगण्यात येते.

याच लग्न समारंभाची प्रथा अखंडित ठेवत, धारुर तालुक्यातील सर्वच ग्रामस्थ एकत्र येऊन हे लग्न मोठ्या थाटात पार पाडतात. केवळ धारुर तालुक्यातील नव्हे तर सबंध पंचक्रोशीतील वर्‍हाडी मंडळी या लग्न समारंभाला उपस्थित राहतात. अनेक वर्षांची ही परंपरा आजतागायत कायम असल्याने नव्या पिढीत देखील या लग्नाची चर्चा तितक्याच उत्सुकतेने होते.

Sugarcane and Turmeric Wedding