ना कार्यक्रम, ना बैठक, राज्यपाल नागपूर मुक्कामी, मुंबई परतीचा उल्लेख नाही

| Updated on: Jul 22, 2020 | 10:01 AM

महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून नागपुरात मुक्कामी आहे. ते आज (22 जुलै) दुपारी 12 वाजता नागपुरात येणार आहेत (Bhagatsingh Koshyari in nagpur).

ना कार्यक्रम, ना बैठक, राज्यपाल नागपूर मुक्कामी, मुंबई परतीचा उल्लेख नाही
Follow us on

नागपूर : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आजपासून नागपुरात मुक्कामी आहे. आज (22 जुलै) दुपारी 12 वाजता भगतसिंग कोश्यारी नागपुरात येणार आहेत (Bhagatsingh Koshyari going to nagpur). मात्र, त्यांच्या दिवसभराच्या वेळापत्रकात ते कोणत्याही बैठकीला अथवा कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख नाही. तसेच त्यांच्या मुंबईला परतण्याचाही यात उल्लेख नाही. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी नागपुरात मुक्काम करण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. मात्र, याबाबत राजभवनाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. अगदी राजभवनातील कर्मचारीही कोरोनाबाधित निघाले आहेत. त्यामुळेच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे आज नागपूरला जात असल्याचे तर्कवितर्क लावले जात आहे. राज्यपाल कोश्यारी नागरपूरला जात आहेत. मात्र, त्यांच्या नियोजित वेळापत्रकात ते कोणत्याही कार्यक्रम अथवा बैठकीला उपस्थित राहणार असल्याचा उल्लेख नाही. विशेष म्हणजे या वेळापत्रकात राज्यपालांच्या मुंबईला परतीच्या प्रवासाचा कोणताही उल्लेख नाही. त्यामुळे राज्यपाल कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मुंबईतून नागपूरमध्ये येत असल्याची जोरदार चर्चा आहे.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

राज्यपालांच्या नागपूर मुक्कमाविषयी तर्कवितर्क लावले जात असेल तरी मुंबईसोबतच नागपूर जिल्ह्यातही कोरोना रुग्णांची संख्या वाढतीच आहे. मंगळवारी (21 जुलै) दिवसभरात नागपूरमध्ये तब्बल 144 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. काल 5 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. आता नागपूर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या 3 हजार 171 वर पोहचली आहे. तसेच नागपूर जिल्ह्यात एकूण कोरोना बळींची संख्या 60 वर पोहोचली आहे. नागपुरात काल 42 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 1 हजार 981 कोरोना रुग्ण बरे झाले.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

हेही वाचा :

Maharashtra Corona Update | पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक सक्रिय रुग्ण, तर मुंबई तिसऱ्या क्रमांकावर

Anil Deshmukh | नागपुरात रेतीघाटांवर गृहमंत्र्यांची धाड, रेती माफियांचे कंबरडे मोडण्याचा अनिल देशमुखांचा निर्धार

शिवसेना मंत्र्याला कोरोनाची लागण

Bhagatsingh Koshyari going to nagpur