Ayodhya Ram Janmabhoomi | 500 वर्ष वाट पाहिली, त्या क्षणाची पूर्ती, एकनाथ खडसे गहिवरले

| Updated on: Aug 05, 2020 | 3:22 PM

राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कारसेवेच्या आठवणींना उजाळा (Eknath Khadse on Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan) दिला.

Ayodhya Ram Janmabhoomi | 500 वर्ष वाट पाहिली, त्या क्षणाची पूर्ती, एकनाथ खडसे गहिवरले
Follow us on

जळगाव : अयोध्या नगरीत राम मंदिर भूमिपूजनाचा ऐतिहासिक सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संपन्न झाला. राम मंदिराच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कारसेवेच्या आठवणींना उजाळा दिला. गेल्या 500 वर्षापासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे, अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. (Eknath Khadse on Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan)

राम जन्मोत्सव हा आमच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय क्षण आहे. गेल्या 500 वर्षांपासून आम्ही या क्षणाची वाट पाहत होतो. आज ही अपेक्षा पूर्ण होत आहे,” असे एकनाथ खडसे म्हणाले.

“राम मंदिराच्या आंदोलनामध्ये मी देखील सहभागी होतो. त्यात अनेकांनी बलिदान दिले. त्यात सर्वांचे योगदान आहे. आज त्या सर्वांच्या आशा पल्लवीत झाल्या. राम मंदिराच्या आंदोलनासाठी मी देखील 15 दिवस जेलमध्ये काढले. त्यामुळे आजचा दिवस माझ्यासाठी अविस्मरणीय आहे,” अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली.

नरेंद्र मोदींच्या हस्ते राम मंदिर भूमिपूजन

नरेंद्र मोदी आज (5 ऑगस्ट) सकाळी साडेअकराच्या सुमारास अयोध्येत दाखल झाले. आधी त्यांनी हनुमान गढीला जाऊन दर्शन घेतलं. त्यानंतर रामलल्लाच्या मूर्तीला साष्टांग दंडवत घालत नरेंद्र मोदी यांनी आरती केली. त्यानंतर प्रत्यक्ष राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याचे विधी पार पडले.

हेही वाचा – राम जन्मभूमीत मोदींच्या हस्ते पारिजातकाचे वृक्षारोपण, प्राजक्ताच्या झाडाचे महत्त्व काय?

राम मंदिर भूमिपूजनाच्या कार्यक्रमावेळी मुख्य मंचावर पंतप्रधान मोदींसह केवळ 5 जणांना स्थान देण्यात आलं होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आणि उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल आणि महंत नृत्यगोपालदास महाराज यांचा समावेश होता. भूमिपूजनाला देशातील 36 परंपरांच्या 135 साधू-संतांचे आशीर्वाद लाभले.

हा उत्सव साजरा करण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत दाखल झाले. अयोध्येला जणू दिवाळीचे स्वरुप आले आहे. (Eknath Khadse on Ayodhya Ram Mandir Bhoomipoojan)

संबंधित बातम्या : 

भूमिपूजनानंतर उद्धव ठाकरेही अयोध्येत जाणार, शिवसेना थाटामाटात कार्यक्रम करणार : संजय राऊत

Narendra Modi Ayodhya Live | मावळे छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याचे माध्यम झाले, तसे प्रत्येकाच्या सहकार्याने राम मंदिराचे निर्माण : नरेंद्र मोदी