पाकिस्तानमध्ये मशिदीजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

| Updated on: Jul 05, 2019 | 3:47 PM

लाहोर : पाकिस्तानमधील लाहोरच्या दाता दरबारी मशिदीजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये सैन्याच्या 3 अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती लाहोरचे पोलीस महासंचालक अशफाक अहमद खान यांनी दिली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. जखमींपैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हा […]

पाकिस्तानमध्ये मशिदीजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट, 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
Follow us on

लाहोर : पाकिस्तानमधील लाहोरच्या दाता दरबारी मशिदीजवळ आत्मघातकी बॉम्बस्फोट झाला. यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 24 पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मृतांमध्ये सैन्याच्या 3 अधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती लाहोरचे पोलीस महासंचालक अशफाक अहमद खान यांनी दिली. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

जखमींपैकी 8 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हा बॉम्बस्फोट मशिदीच्या गेट क्रमांक 2 च्या जवळील एका गाडीजवळ झाला. मशिदीजवळील पोलिसांची गाडी उडवण्यासाठी हा स्फोट केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. दाता दरबार मशिद पाकिस्तानमधील सर्वाधिक गर्दी असलेल्या मशिदींपैकी एक आहे. हा आत्मघातकी स्फोट असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पोलिसांच्या गाडीचे मोठे नुकसान

घटनास्थळाचा तपास सुरु करण्यात आला आहे. त्याआधी जखमींना उपचारासाठी हलवण्यात आले. दहशतवादविरोधी पथकासह न्यायवैद्यक पथकाचे अधिकारीही घटनास्थळावर पोहचले. ते परिसराची पाहणी करुन पुरावे गोळा करण्याचे प्रयत्न करत आहेत. परिसरात हाय अलर्टही देण्यात आला आहे. सर्व पोलीस ठाण्यांना त्यांच्या भागातील सुरक्षेची पाहणी करण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच रमजानच्या महिन्यात सतर्क राहण्यास सांगण्यात आले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी या घटनेचा निषेध केला आहे.  तसेच स्फोटातील मृत्यूंबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.

चौकशीचे आदेश

पाकिस्तानमधील पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री उस्मान बजदार यांनी देखील या घटनेचा निषेध केला. तसेच या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. बजदार यांनी त्यांचे सर्व पूर्वनियोजित दौरे रद्द केले असून आपात्कालीन बैठक बोलावली आहे. जखमींना सर्वोत्तम उपचार देण्याचेही आश्वासन त्यांनी दिले.