भारतात 15 वर्षात बोट दुर्घटना वाढल्या, 10 हजार 580 जणांचा मृत्यू

| Updated on: Sep 16, 2019 | 11:28 AM

दरम्यान भारतात दिवसेंदिवस बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ (Boat Capsize Incident Report) होत असून यामुळे प्रत्येक राज्यात दरवर्षी 30 लोकांना प्राण गमवावा लागतो.

भारतात 15 वर्षात बोट दुर्घटना वाढल्या, 10 हजार 580 जणांचा मृत्यू
Follow us on

नवी दिल्ली : आंध्र प्रदेशातील गोदावरी नदीत रविवारी एका प्रवाशी बोट उलटल्याने 12 लोकांचा मृत्यू झाला. तर 30 पेक्षा अधिक प्रवाशी अद्याप बेपत्ता आहेत. त्याआधी काही दिवसांपूर्वी गणपती विसर्जनादरम्यान भोपाळमध्ये बोट उलटली (Boat Capsize) होती. यात 11 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान भारतात दिवसेंदिवस बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत वाढ (Boat Capsize Incident Report) होत असून यामुळे प्रत्येक राज्यात दरवर्षी 30 लोकांना प्राण गमवावा लागतो. राष्ट्रीय गुन्हे नोंद अन्वेषण (National Crime Records Bureau – NCRB) यांनी याबाबतची धक्कादायक (Boat Capsize Incident Report) माहिती दिली आहे.

तर 2001 पासून 2015 पर्यंत राज्यात बोट उलटण्याच्या 8 हजार 772 घटना घडल्या आहेत. यात 10 हजार 580 लोकांचा मृत्यू (Boat Capsize Accident) झाला आहे. या आकडेवारीनुसार दरवर्षी 700 लोकांचा मृत्यू हा बोट (Boat Capsize Incident Report) उलटल्याने होतो.

NCRB ने दिलेल्या माहितीनुसार, 2001 ते 2015 मध्ये आंध्रप्रदेशात एकूण 493 लोकांचा बोट उलट्याने मृत्यू झाला आहे. तर 2016 ते 2019 मध्ये 120 जणांचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत झालेल्या बोट दुर्घटनेतील (Boat Capsize Incident Report) मृतांमध्ये सर्वाधिक पुरुषांचा समावेश आहे. गेल्या 15 वर्षात बोट दुर्घटनेत मृत झालेल्यांमध्ये 7 हजार 710 पुरुष, तर 2870 महिलांचा समावेश आहे.

बोट दुर्घटनेत उत्तर प्रदेशात 1753, मध्य प्रदेश 1665, बिहार 1216 आणि छत्तीसगड 864 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर तामिळनाडू 630, आसाम 608, गुजरात 547, आंध्र प्रदेश 493, कर्नाटक 447 जणांचा बोट उलट्याने मृत्यू झाला आहे.

त्याशिवाय ओडीसा 386, केरळ 360, महाराष्ट्र 310, पश्चिम बंगाल 289, हरियाणा 250 झारखंड 201 लोकांचा बोट उलटल्याने मृत्यू झाला आहे. विशेष बाब म्हणजे गेल्या 15 वर्षात सिक्कीममध्ये एकही बोट उलटल्याची दुर्घटना घडलेली नाही. तर हिमाचल प्रदेश आणि नागालँड या ठिकाणी गेल्या 15 वर्षात फक्त एकच बोट उलटल्याची घटना समोर आली आहे.

दरम्यान आतापर्यंत दुर्घटनाग्रस्त झालेल्या बोटींमध्ये शिकाऊ चालक नसणे किंवा विनापरवाना बोट चालवणे या गोष्टींचा प्रामुख्याने समावेश आहे. देशात वाढत्या बोट दुर्घटनेमुळे (Boat Capsize Incident Report) केंद्रीय पर्यटन विभागाने राज्यातील सर्व पर्यटन विभागांसाठी काही अधिसूचना जारी केल्या आहेत. त्या सूचनांचे काटकोरपणे पालन करावे आणि अशाप्रकराच्या घटना राज्यात पुन्हा होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही केंद्रीय पर्यटन विभागाने सांगितले आहे.