Actor Asif Basra suicide : आसिफ बसरांच्या निधनाने बॉलिवूडजगतात खळबळ, इम्रान हाश्मीकडून श्रद्धांजली

| Updated on: Nov 12, 2020 | 7:28 PM

अभिनेते आसिफ बसरा यांच्या निधनाने बॉलिवूडजगतात खळबळ उडाली आहे. त्यांच्या अनेक सहकलाकारांना या घटनेने धक्का बसला आहे.

Actor Asif Basra suicide : आसिफ बसरांच्या निधनाने बॉलिवूडजगतात खळबळ, इम्रान हाश्मीकडून श्रद्धांजली
Follow us on

मुंबई : या वर्षात बॉलिवूडने अनेक दिग्गज गमावले आहे. या धक्क्यातून सावरत असतानाच, मनोरंजन विश्वाला आणखी एक धक्का बसला आहे. ‘काय पो छे’ चित्रपटात सुशांत सिंह राजपूतसोबत सहकलाकाराच्या भूमिकेत झळकलेले अभिनेते आसिफ बसरा यांनी आत्महत्या (Actor Asif Basra suicide) केली आहे. हिमाचल प्रदेशातील मॅकलॉडगंजमधील जोगीवाडा रोडवरील कॅफेजवळ असिफ यांनी आपले आयुष्य संपवले.

आसिफ यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. मात्र, मागील काही काळापासून ते नैराश्यात होते. आसिफ यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला आहे. मूळचे अमरावतीचे असणारे आसिफ बसरा हे गेल्या 5 वर्षांपासून मॅकलॉडगंज येथे एका भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची परदेशी मैत्रीणदेखील राहत होती. माध्यमांच्या वृत्तानुसार गुरुवारी (12 नोव्हेंबर) दुपारी आसिफ आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवण्यासाठी घराबाहेर पडले होते. मात्र, त्याच कुत्र्याच्या पट्ट्याने गळफास घेत त्यांनी आयुष्य संपवले

आसिफ यांच्या निधनाने बॉलिवूडजगतात खळबळ उडाली आहे. त्यांच्या अनेक सहकलाकारांना या घटनेने धक्का बसला आहे. बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांनी आसिफ यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. दिग्दर्शक हंसल मेहता यांनी ट्विट केलं आहे की, “आसिफ बसरा! हे सत्य असू शकत नाही, ही गोष्ट खूप दुःखी करणारी आहे”.

‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटात आसिफ यांच्यासोबत काम करणारा अभिनेता इम्रान हाश्मी याने आसिफ यांना ट्विटरवरुन श्रद्धांजली वाहिली आहे. इम्रानने “भावपूर्ण श्रद्धांजली आसिफ भाई” असं ट्विट केलं आहे.

अभिनेता मनोज वाजपेयी यानेदेखील ट्विट करुन आसिफ यांना आदरांजली वाहिली आहे. मनोज वाजपेयी यांनी ट्विट केलं आहे की, “ही खूप धक्का देणारी घटना आहे. लॉकडाऊनपूर्वी मी त्यांच्यासोबत शुटिंग केलं होतं. हे भगवान”

अभिनेत्री स्वरा भास्करने न्यूज एजन्सी एएनआयचं ट्विट रिट्विट करत तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आसिफ बसरा कोण आहेत?

अभिनेते आसिफ बसरा यांनी निर्माता दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘ब्लॅक फ्रायडे’मध्ये आणि राहुल ढोलकीया यांच्या ‘परझानिया’ चित्रपटांत केलेल्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. यानंतर त्यांचं भरपूर कौतुकही झालं. विशेष म्हणजे त्यांनी अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या ‘काय पो छे’ या चित्रपटातही भूमिका केली होती.

आसिफ यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज अभिनेत्यांसोबतही काम केलं होतं. ते मिशेल ओ साजबेल यांच्या ‘वन नाईट विथ किंग’ या चित्रपटातही झळकले होते. या चित्रपटात त्यांनी ओमर शरिफ आणि पेटर ओ टूल यांच्यासोबत काम केलं.

आसिफ बसरा यांनी 2010 च्या गाजलेल्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ या चित्रपटात शोएब या पात्राची भूमिका केली होती, ज्यात ते इमरान हाश्मीच्या वडिलांच्या भूमिकेत पाहायला मिळाले. त्यांनी ‘लम्हा’ या हिंदी चित्रपटातही दमदार भूमिका केली होती.

संबंधित बातमी

Actor Asif Basra suicide : ‘काय पो छे’मधील आणखी एका अभिनेत्याची आत्महत्या, आसिफ बसराने आयुष्य संपवलं!

(bollywood celebs reaction on actor Asif Basra suicide)