ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रियाला जामीन, कोणी माफी मागितली का?, फरहान अख्तरचा सवाल

| Updated on: Oct 07, 2020 | 5:04 PM

रियाला जामीन मंजूर झाल्यानंतर बॉलिवूडमधील काही कलाकार अत्यंत आनंदी झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आनंद व्यक्त केला आहे.

ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी रियाला जामीन, कोणी माफी मागितली का?, फरहान अख्तरचा सवाल
Follow us on

मुंबई : अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने सुशांत सिंह राजपूत मृत्यूशी संबंधित ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी (Bollywood Celebs Reaction On Rhea Chakraborty Bail) अटक केली होती. मात्र, आता रियाला मुंबई उच्च न्यायालयाने सर्शत जामीन मजूर केला आहे. रियाला 1 लाखांच्या वैयक्तिक बाँडवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या अटींनुसार, रियाला तिचा पासपोर्ट जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, तिला मुंबईबाहेर जायचे असल्यास परवानगी घेणे आवश्यक असणार आहे. चौकशीदरम्यान पोलिस स्टेशनला हजेरी लावणे बंधनकारक असणार आहे (Bollywood Celebs Reaction On Rhea Chakraborty Bail).

रियाला जामीन मंजूर झाल्यानंतर बॉलिवूडमधील काही कलाकार अत्यंत आनंदी झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचा आनंद व्यक्त केला आहे. तर अभिनेता फरहान अख्तरने (Farhan Akhtar) प्रसारमाध्यमांवर टीका केली आहे.

“रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबाची कोणी माफी मागितली का? माझ्या मते तरी नाही. पण आता ते पाहा त्यांचे गोलपोस्ट्स कसे बदलतात. त्यासाठी ते कुख्यात आहेत”, असं ट्वीट फरहान अख्तरने केलं.

रियाला जामीन मिळाल्यानंतर अनुभव सिन्हा (Anubhav Sinha) यांना अत्यंत आनंद झाला आहे. त्यांनी सोशल मीडियावर त्यांचा हा आनंद व्यक्त केला. “फायनली, रिया चक्रवर्तीला जामीन मिळाला”, असं ट्वीट त्यांनी केलं. अनुभव यांच्या ट्वीटला अनुराग कश्यपने री-ट्वीट केलं आहे (Bollywood Celebs Reaction On Rhea Chakraborty Bail).

तर तापसी पन्नूने (Taapsee Pannu) लिहिलं “काही दिवसांपूर्वी ती होती, उद्या तुम्ही असू शकता, पण न्यायालय तुम्हाला न्याय नक्की देईल, इतका विश्वास ठेवा”.

तर सोनी राजदानने (Soni Razdan) हात जोडणारा इमोजी ट्वीट करत मुंबई उच्च न्यायालयाला टॅग केलं.

शोविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच

रियाचा भाऊ भाऊ शोविक चक्रवर्ती (Shauvik Chakraborty) याला जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. रियाला 8 सप्टेंबरला दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी एनसीबीकडून अटक करण्यात आली होती. त्यानंतर तिला कोर्टात हजर करण्यात आलं होतं. मात्र, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या सुनावणीत तिचा जामीन अर्ज फेटाळून लावण्यात आला होता. एनसीबीने तीन दिवस 15 तास चौकशी केल्यानंतर रियाला अटक केली होती. अभिनेत्री रिया चक्रवर्तीला एनसीबीने कलम 27 (A) अंतर्गत अटक झाली होती. ड्रग्ज तस्करीसाठी पैशाची देवाणघेवाण करण्याचा हा गुन्हा आहे. त्यानुसार 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद आहे. अशा प्रकरणात कोर्ट सामान्यपणे जामीन देत नाही.

रियाच्या अटकेच्या चार दिवसांपूर्वी तिचा भाऊ शोविक चक्रवर्तीला एनसीबीने अटक केली होती. त्याच्यासोबत सॅम्युअल मिरांडालाही अटक झाली होती (Bollywood Celebs Reaction On Rhea Chakraborty Bail).

संबंधित बातम्या :

Rhea Chakraborty bail | अखेर रिया चक्रवर्तीचा जामीन मंजूर, शौविक चक्रवर्तीला दिलासा नाहीच!