बॉलीवूडचं यंग ब्रिगेड पंतप्रधानांच्या भेटीला, रणवीरची मोदींसमोरही मस्ती

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

नवी दिल्ली : बॉलीवूडचं यंग ब्रिगेड गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला नवी दिल्लीला पोहोचलं. बॉलीवूडमधील तरुण चेहरे म्हणजेच रणवीर सिंह, आलिया भट्ट, रणबीर कपूर, वरुण धवन, एकता कपूर, करण जोहरसह इतर कलाकारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. ही यंग ब्रिगेड पंतप्रधानांच्या भेटीला का गेली होती, यामागील कारण आद्याप स्पष्ट झालेलं नाही. काहीच दिवसांआधी पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असताना […]

बॉलीवूडचं यंग ब्रिगेड पंतप्रधानांच्या भेटीला, रणवीरची मोदींसमोरही मस्ती
Follow us on

नवी दिल्ली : बॉलीवूडचं यंग ब्रिगेड गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटायला नवी दिल्लीला पोहोचलं. बॉलीवूडमधील तरुण चेहरे म्हणजेच रणवीर सिंह, आलिया भट्ट, रणबीर कपूर, वरुण धवन, एकता कपूर, करण जोहरसह इतर कलाकारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. ही यंग ब्रिगेड पंतप्रधानांच्या भेटीला का गेली होती, यामागील कारण आद्याप स्पष्ट झालेलं नाही. काहीच दिवसांआधी पंतप्रधान मुंबई दौऱ्यावर असताना बॉलीवूडच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेतली होती, यावेळी त्यांनी चित्रपट उद्योगासंबंधीत मुद्यांवर चर्चा केली, तसेच चित्रपटांच्या तिकिटांवरील जीएसटी कमी करण्याची मागणीही काली होती. यानंतर सरकारने चित्रपटांच्या तिकिटांवरील जीएसटी कमी केला.

या भेटीदरम्यान रणवीर सिंहने पंतप्रधानांना जादूची झप्पीही दिली. तसेच त्यांच्यासोबत सेल्फीही घेतला. या फोटोला रणवीरने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले. या फोटोला त्याने ‘जादू की झप्पी, पीएम मोदींना भेटून आनंद झाला’, असे कॅप्शनही दिले. पंतप्रधानांसमोरही रणवीर मस्ती करत असल्याचं या फोटोमध्ये दिसत आहे.

या फोटोला चित्रपट समीक्षक तरण आदर्शने आपल्या ट्वीटर अकाऊंटवर शेअर करत याबाबतची माहिती दिली.


ही भेट निर्माता करण जोहरने आयोजित केली असल्याचं बोललं जात आहे. चित्रपट उद्योगातील शिष्टमंडळात दिग्दर्शक आणि कलाकार समाविष्ट आहेत. यात दिग्दर्शक रोहित शेट्टी, अभिनेता राजकुमार राव, विक्की कौशल, आयुष्मान खुराना, सिद्धार्थ मल्होत्रा आणि अभिनेत्री भूमी पेडनेकर आहेत.

याआधी 19 डिसेंबरला निर्मात्यांसोबत झालेल्या बैठकीत कुठलीही महिला प्रतिनिधी नसल्याने सोशल मीडियावर याबाबत टीका केली गेली. त्यानंतर पॅनलमध्ये आलिया भट्ट आणि भूमी पेडनेकरला सामाविष्ट करण्यात आले. या मुद्यावरुन अभिनेता-निर्माता अजय देवगन, अक्षय कुमार, करण जोहर, सिद्धार्थ राय कपूर, रितेश सिधवानी यांना सोशल मीडियावर लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागले होते.