नातेवाईकांनी नाकारलं, बुलडाण्यात मुस्लीम युवकाकडून कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाला अग्नी

| Updated on: Sep 16, 2020 | 4:53 PM

बुलडाण्यात नातेवाईकांनी नाकारलेल्या कोरोना रुग्णांवर सामाजिक कार्यकर्त्यांना अंत्यसंस्कार करावे लागले.

नातेवाईकांनी नाकारलं, बुलडाण्यात मुस्लीम युवकाकडून कोरोनाग्रस्ताच्या मृतदेहाला अग्नी
Follow us on

बुलडाणा : कोरोनामुळे माणुसकीचा मृत्यू होत आहे (Muslim Man Perform Cremation Of Hindu). बुलडाण्यात नातेवाईकांनी नाकारलेल्या कोरोना रुग्णांवर सामाजिक कार्यकर्त्यांना अंत्यसंस्कार करावे लागले. हिंदू व्यक्तीला मुस्लीम युवकाने अग्नी देत एकतेचे दर्शन घडवले (Muslim Man Perform Cremation Of Hindu).

बुलडाणामध्ये कोरोनाग्रस्त 45 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. या रुग्णाच्या नातेवाईकांनी त्याच्या अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे बुलडाणा शहरातील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजहर यांनी नगरपरिषदच्या कर्मचाऱ्यांसोबत या रुग्णावर अंत्यसंस्कार केले. कोरोनाच्या धास्तीमुळे अक्षरशः नातेवाईकच मृतदेह स्वीकारण्यास नकार देत असल्याने माणुसकीचा मृत्यू होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

संपूर्ण जगात कोरोनाने हाहाकार माजवला असून बुलडाणा जिल्ह्यात देखील वाढत्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसोबतच रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण देखील 64 च्यावर पोहचले आहे. डोनगाव येथील एका रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. मात्र, त्याच्या नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला. त्यामुळे बुलडाणा येथील सामाजिक कार्यकर्ते मोहम्मद अजहर यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत नगर परिषद कर्मचाऱ्यांसोबत मिळून या रुग्णावर हिंदू परंपरेने अंत्यसंस्कार करत सामाजिक एकतेचे दर्शन घडवले आहे.

देशावर आजपर्यंत अनेक साथीच्या रोगांचे संकट आले. मात्र, या कोरोनामुळे तर रक्ताच्या नात्यांचे लोक देखील मृतदेह स्वीकारण्यास घाबरत असल्याने माणुसकी लोप पावत असल्याची परिस्थिती निर्माण झाली.

Muslim Man Perform Cremation Of Hindu

संबंधित बातम्या :

आधी नागपुरातील प्रस्तावित कोव्हिड रुग्णालय उभारा, उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलं

नवी मुंबईत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता, पालिकेकडून युद्ध पातळीवर तयारी

नागपूर शहरात धनदांडग्यांनी बेड अडवल्याने गरीब वंचित, खुद्द महापौरांची कबुली