मुलांचं अपहरण आणि गैरवर्तनाचे आरोप असणारा नित्यानंद दक्षिण अमेरिकेत?

| Updated on: Nov 24, 2019 | 4:11 PM

मुलांचं अपहरण करत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या स्वयंघोषित स्वामी नित्यानंद याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Case filed against Accused Swami Nityanand).

मुलांचं अपहरण आणि गैरवर्तनाचे आरोप असणारा नित्यानंद दक्षिण अमेरिकेत?
Follow us on

नवी दिल्ली : मुलांचं अपहरण करत गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या स्वयंघोषित स्वामी नित्यानंद याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला (Case filed against Accused Swami Nityanand). त्यानंतर नित्यानंद फरार झाल्याचं बोललं जात आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर अटकेच्या भीतीने तो दक्षिण अमेरिकेत गेल्याचंही सांगितलं जात आहे.

कर्नाटकमध्ये नित्यानंदविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याने कारवाईपासून वाचण्यासाठी लपण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तो परदेशात पळाल्याची चर्चा आहे. मात्र, तो परदेशात जाण्याविषयी अनेक प्रश्नही उपस्थित केले जात आहे. गुजरात पोलिसांनाही आरोपी नित्यानंद दक्षिण अमेरिकेत गेल्याचा संशय आहे. मात्र, त्याच्या पासपोर्टचं नुकणीकरण करण्याची तारिख सप्टेंबर 2018 असल्याचंही समोर आलं आहे. त्यासाठी त्याला नाहरकत प्रमाणपत्र न मिळाल्याने हे नुतणीकरण होऊ शकलेलं नाही, अशी माहिती पासपोर्ट विभागाकडून दिली गेली आहे. त्यामुळे तो सप्टेंबर 2018 च्या आधीपासून परदेशात गेला का? असा प्रश्न उपस्थित होतो.

गुजरात पोलिसांना सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “पासपोर्टसंबंधितच्या कागदपत्रांची तपासणी केली असता नित्यानंद पासपोर्ट नुतणीकरणाची तारीख जवळ येताच देश सोडून दक्षिण अमेरिकेतील एका शहरात लपला”

गुजरात पोलिसांनी आरोपी नित्यानंदवर मुलांचं अपहरण आणि गैरवर्तन प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच बुधवारी (20 नोव्हेंबर) त्याच्या अहमदाबाद येथील आश्रमावर छापाही टाकण्यात आला. या छाप्यात काही अल्पवयीन मुलांची सुटका करण्यात आली आहे. तसेच नित्यानंदच्या आश्रमातील दोन सहकारी महिलांनाही अटक करण्यात आली.