50 मुलांचं लैंगिक शोषण, सीबीआयकडून यूपी सिंचन विभागाच्या इंजिनीअरला अटक

| Updated on: Nov 17, 2020 | 10:43 PM

केंद्रीय तपास संस्था - सीबीआयने (CBI) 10-15 वयोगटातील 50 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे.

50 मुलांचं लैंगिक शोषण, सीबीआयकडून यूपी सिंचन विभागाच्या इंजिनीअरला अटक
Follow us on

लखनौ : केंद्रीय तपास संस्था – सीबीआयने (CBI) 10-15 वयोगटातील 50 अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका बड्या अधिकाऱ्याला अटक केली आहे. संबंधित अधिकारी उत्तर प्रदेशच्या सिंचन विभागात कनिष्ठ अभियांत्रिक (ज्यूनिअर इंजिनीअर) आहे. चित्रकूट (Chitrakoot) जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार घडला. मागील काही महिन्यांपासून बांदा, चित्रकूट आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातून बाल लैंगिक शोधणाच्या तक्रारी आल्या होत्या. यानंतर ही कारवाई झाली आहे (CBI arrested junior engineer of irrigation department for making obscene videos and child sexual harassment).

आरोपीने अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तर केलेच, सोबत याचे अश्लील व्हिडीओ आणि इतर आक्षेपार्ह माहिती डार्कवेबवर अपलोड केली. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुलांच्या या अश्लील व्हिडीओचं रेकॉर्डिंग मोबाईल, लॅपटॉप, स्पाय कॅमेरा आणि पेन ड्राईव्हमध्ये ठेवण्यात आले होते.

आरोपीने हे सर्व व्हिडीओ विकून पैसे कमावण्यासाठी डार्कवेबच्या मदतीने अपलोड केले होते. सीबीआई या प्रकरणी आरोपीच्या घरावर छापा टाकला. यात 8 लाख रुपये रोख रक्कम, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, सेक्स टॉईज जप्त करण्यात आले आहेत. या सर्व साहित्याचा उपयोग अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी केला जात होता.

आरोपीच्या ईमेल आयडीवरुन आरोपी केवळ भारतीय नाही, तर अगदी परदेशी नागरिकांच्याही संपर्कात असल्याचं उघड झालंय. आरोपी अनेक वर्षांपासून मुलांचं लैंगिक शोषण करत त्यांच्या व्हिडीओची विक्री करत होता. तसेच याबाबतच्या नवे व्यवहारही करत होता.

या प्रकरणातील नेटवर्कमधील आरोपीच्या संपर्कातील इतर लोकांचाही शोध घेतला जात आहे. तसेच या अल्पवयीन मुलांचे व्हिडीओ खरेदी करणाऱ्यांचाही शोध घेतला जातोय. सीबीआयने मुलांशी संबंधित या प्रकरणांचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार केलं आहे. त्याला ऑनलाईन सेक्शुअल अॅब्यूज अँड एक्सप्लॉयटेशन इन्वेस्टीगेशन असं नाव देण्यात आलं आहे.

उत्तर प्रदेशच्या सिंचन विभागातील या आरोपी इंजिनिअरने अनेक लहान मुलांना अमिष दाखवून आपल्या जाळ्यात ओढले होते. तो मुलांना मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू देऊन गप्प बसण्यास सांगत होता. त्याने एका मागोमाग एक असे अनेक मुलांचं शोषण केलं. मात्र, आता सीबीआयने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

संबंधित बातम्या :

बालपणी माझे लैंगिक शोषण झाले होते; आमिर खानच्या मुलीचा खळबळजनक खुलासा

संगमनेरमध्ये भावाकडून अल्पवयीन बहिणीवर लैंगिक अत्याचार, मुलगी गरोदर राहिल्याने प्रकार उघड

नागपुरात भाडेकरु दाम्पत्याकडून घर मालकिणीचं लैंगिक शोषण, पती-पत्नीला अटक

CBI arrested junior engineer of irrigation department for making obscene videos and child sexual harassment