50 मुलांचं लैंगिक शोषण, व्हिडीओ विक्रीसाठी डार्कवेबवर, पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्याला सीबीआयकडून अटक

| Updated on: Nov 18, 2020 | 5:27 PM

ओरोपीने लैंगिक शोषणासोबतच मुलांचे अश्लील व्हिडीओ आणि आपत्तीजनक सामग्री डार्कवेबच्या माध्यमातून इंटरनेटवर अपलोड केली होती.

50 मुलांचं लैंगिक शोषण, व्हिडीओ विक्रीसाठी डार्कवेबवर, पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंत्याला सीबीआयकडून अटक
Follow us on

लखनौ : केंद्रीय तपास संस्थेने उत्तर प्रदेशच्या चित्रकूट जिल्ह्यातील एका व्यक्तीला बाल लैंगिक शोषण (Child Sexual Harassment) प्रकरणात अटक करण्यात आली आहेत. सीबीआयनुसार, गेल्या काही महिन्यांमध्ये बांदा, चित्रकूट आणि त्याच्या जवळपासच्या परिसरातील 10 ते 15 वर्षांच्या मुलांच्या बाबतीत बाल लैंगिक शोषणाच्या तक्रारी आल्या आहेत (Child Sexual Harassment).

ओरोपीने लैंगिक शोषणासोबतच मुलांचे अश्लील व्हिडीओ आणि आपत्तीजनक सामग्री डार्कवेबच्या माध्यमातून इंटरनेटवर अपलोड केली होती. सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मुलांचे अश्लील कंटेंट रिकॉर्डिंग मोबाईल, लॅपटॉप, स्पाय कॅमेरा आणि पेन ड्राईव्हमध्येही ठेवण्यात आले होते.

इतकंच नाही तर या आरोपीने डार्कवेबच्या माध्यमातून या अश्लील कंटेंटला इंटरनेटवर विकण्यासाठी अपलोड केलं होतं. सीबीआयने तपासादरम्यान या प्रकरणात आरोपीच्या घरावर धाड टाकली यामध्ये 8 लाख रुपये कॅश, पेन ड्राईव्ह, मेमरी कार्ड, सेक्स टॉईज जप्त केले आहेत. यासर्व सामानांचा वापर अश्लील व्हिडीओ तयार करण्यासाठी केला जात होता.

आरोपी फक्त भारतीय नाही तर विदेशी नागरिकांच्याही संपर्कात होता. तो एनेक वर्षांपासून मुलांच्या लैंगिक शोषणाचे व्हिडीओ विकत होता, त्याशिवाय त्यांची डीलही करत होता, त्याच्या ई-मेलवरुन या गोष्टी उघडकीस आल्या (Child Sexual Harassment).

सध्या या नेटवर्कशी जोडलेल्या इतर लोकांचा शोध सुरु आहे. सोबतच चिमुकल्यांचे अश्लील व्हिडीओ विकत घेणाऱ्यांचाही शोध घेतला जात आहे. सीबीआयने लहान मुलांशी संबंधित प्रकरणांच्या तपासासाठी एक विशेष युनिट, ऑनलाईन सेक्शुअल अब्यूज अँड अक्सप्लॉयटेशन इनव्हेस्टीगेशनही तयार करण्यात आली आहे.

पीटीआयनुसार, आरोपी उत्तर प्रदेशातील पाटबंधारे विभागात कनिष्ठ अभियंता म्हणून कार्यरत आहे. तो लहान मुलांना आमिष देवून आपल्या जाळ्यात अडकवायचा. तो मोबाईल फोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅजट्स देवून तोंड बंद ठेवायला सांगायचा. आता या आरोपीला अटक करण्यात आली आहे.

आरोपीने बांदा, चित्रकूट आणि हमीरपूर येथील जवळपास 50 मुलांचं लैंगिक शोषण केलं. त्याला बांदा येथून अटक करण्यात आली आहे.

Child Sexual Harassment

संबंधित बातम्या :

ऐन दिवाळीत प्रेमविवाह केलेल्या जोडप्याची आत्महत्या, पतीने विष घेऊन तर पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या

पिंपरीत शौचालयाच्या टाकीत सापडला अज्ञात मृतदेहाचा सांगाडा, पोलीस तपास सुरू