सीबीआयची मोठी कारवाई, 19 राज्यांमध्ये 110 ठिकाणी छापे

| Updated on: Jul 10, 2019 | 12:07 AM

केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज देशभरात 19 राज्यांमध्ये 110 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत सीबीआयचे एकूण 500 हून अधिक अधिकारी सहभागी होते.

सीबीआयची मोठी कारवाई, 19 राज्यांमध्ये 110 ठिकाणी छापे
Follow us on

नवी दिल्ली: केंद्रीय अन्वेषण विभागाने (CBI) आज देशभरात 19 राज्यांमध्ये 110 ठिकाणी छापेमारी केली. या कारवाईत सीबीआयचे एकूण 500 हून अधिक अधिकारी सहभागी होते. सीबीआयची ही कारवाई 2006-07 नंतरची सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे.

केंद्र सरकारने भ्रष्टाचारविरोधात कारवाईच्या निर्देशांनंतर सीबीआयने देशभरात छाप्यांचे सत्र सुरु केले. भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि शस्त्रास्त्रांची अवैध तस्करी इत्यादी प्रकरणांमध्ये सीबीआयने 30 तक्रारी दाखल केल्या आहेत. महाराष्ट्रासह सीबीआयने दिल्ली, उत्तरप्रदेश, उत्तराखंड, ओडिशा, हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्ये 110 ठिकाणी छापेमारी केली. या ठिकाणांमध्ये पुणे, मुंबई, दिल्ली, भरतपूर, चंडीगड, जम्मू, श्रीनगर, पुणे, जयपूर, गोवा, कानपूर, रायपूर, हैदराबाद, मदुरई, कोलकाता, रांची, बोकारो आणि लखनौसह अनेक शहरांचा समावेश आहे.

याआधी सीबीआयने 2 जुलै रोजी 18 शहरांमधील 50 ठिकाणी छापे मारले होते. सीबीआयने फसवणूक, अधिकारांचा गैरवापर अशा आरोपांखाली निलंबित आयकर आयुक्त संजय कुमार श्रीवास्तव यांच्या घरावरही छापे टाकले.