चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेत कोरोना रुग्ण, दोन्ही इमारती सील

| Updated on: Jul 31, 2020 | 9:49 PM

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेची इमारत एकाच दिवशी सील करण्यात आली (Chandrapur ZP and Collector office seal) आहे.

चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेत कोरोना रुग्ण, दोन्ही इमारती सील
Follow us on

चंद्रपूर : चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेची इमारत एकाच दिवशी सील करण्यात आली आहे. या दोन्ही इमारतीत काम करणारे अधिकारी आणि कर्मचारी कोरोनाबाधित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तर जिल्हा परिषदेच्या बाधित अधिकाऱ्यावर बेजबाबदार वर्तनाचा ठपका ठेवत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. (Chandrapur ZP and Collector office seal)

गेल्या पाच महिन्यांपासून कोरोनाच्या लढ्यात चंद्रपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय सक्रियतेने काम करत आहे. याच कार्यालयातून जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणा कोरोना नियंत्रणाचे काम करत आहे. मात्र याच कार्यालयातील 3 लिपीक कोरोनाबाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली. या कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या सर्वांचीच स्वॅब टेस्ट घेण्यात येणार आहे.

तसेच सर्व खबरदारी घेताना जिल्हाधिकारी कार्यालय उद्या एक दिवस स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण प्रक्रियेसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. सध्या बाधित कर्मचाऱ्यांची कुठलीही ट्रॅव्हल हिस्ट्री नसल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. कोरोनाबाधितांच्या संपर्कातील इतरांच्या तपासणीनंतर पुढचे निर्णय घेण्यात येणार आहेत.

Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर 

दरम्यान आज चंद्रपूर जिल्हा परिषदेची मुख्य इमारत सील करण्यात आली आहे. या कार्यालयाशी संबंधित एक कक्ष अधिकारी कोरोनाबाधित आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. अवैधरित्या नागपुरात वास्तव्याला असलेला हा अधिकारी बदली प्रक्रियाच्या निमित्ताने अचानक जिल्हा परिषदेत आला होता. हे लक्षात आल्यावर त्याला अलगीकरणात पाठवण्यात आले होते.

त्याच्या स्वॅब टेस्ट दरम्यान तो कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. यानंतर लगेच जिल्हा परिषद कार्यालयात फवारणी आणि निर्जंतुकीकरण अभियान राबविण्यात येत आहे. पुढचे 3 दिवस जिल्हा परिषद इमारत सील राहणार आहे. बेजबाबदार वर्तन केल्याचा ठपका ठेवत बाधित कक्ष अधिकार्‍यांवर गुन्हा नोंदवण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे.

एकाच दिवशी चंद्रपूर जिल्ह्यातील दोन प्रमुख प्रशासकीय इमारती सील झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच यापुढे प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना अधिक खबरदारी घ्यावी लागणार आहे. (Chandrapur ZP and Collector office seal)

संबंधित बातम्या : 

Nashik Corona | नाशिकमध्ये संचारबंदीतही नागरिक बेफिकीर, दोन कोटींचा दंड, 17 हजार नागरिकांवर कारवाई

नागपूरमध्ये कोरोना काळातही राजकारण, दोन स्वतंत्र बैठका, तरीही निर्णय एकच!