मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र

| Updated on: Dec 24, 2019 | 4:58 PM

मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिलं (CM Uddhav thackeray letter to PM modi) आहे.

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या, उद्धव ठाकरेंचे पंतप्रधान मोदींना पत्र
Follow us on

मुंबई : मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र दिलं (CM Uddhav thackeray letter to PM modi) आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा आणि यासाठी मोदींनी स्वत: तातडीने लक्ष घालून आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे अशी विनंती उद्धव ठाकरेंनी मोदींना पत्राद्वारे केली (CM Uddhav thackeray letter to PM modi) आहे.

उद्धव ठाकरेंनी मोदींना दिलेल्या पत्रानुसार, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समितीने अहवाल दिला आहे. या अहवालाच्या आधारे केंद्र सरकारकडे 16 नोव्हेंबर 2013 रोजी प्रस्ताव सादर करण्यात आला.

अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पूर्ण करते. हा अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करुनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित (CM Uddhav thackeray letter to PM modi) आहे.

तसेच संबंधित विभागाने सदर प्रकरण साहित्य अकादमीच्या भाषा समितीकडे विचारार्थ असल्याचे कळवले आहे. बऱ्याच कालावधीपासून हे प्रकरण प्रलंबित असल्याने पंतप्रधानांनी स्वत: लक्ष घालून मराठीला तातडीने अभिजात भाषेचा दर्जा द्यावा असेही उद्धव ठाकरेंनी नमूद केले आहे.