कोथिंबीरीला चिकन मटणचा भाव, पावसामुळे दर गगनाला

| Updated on: Jul 08, 2019 | 4:06 PM

नागपूरात एक किलो चिकन किंवा मटणाचे दर साधारणत: 400 रुपये आहे. पण हाच दर सध्या नागपूरातील कोथिंबीरीला मिळतो आहे. यामुळे ग्राहकांना चांगलाचं फटका बसतो आहे.

कोथिंबीरीला चिकन मटणचा भाव, पावसामुळे दर गगनाला
Follow us on

नागपूर : नागपूरात गेल्या काही दिवसापासून देशी कोथिंबीरीचा दर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आज नागपूरच्या बाजारात कोथिंबीरीचा भाव 400 रुपये प्रतिकिलो झाला आहे. म्हणजेच जवळपास एक किलो चिकन किंवा मटण घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला जेवढे पैसे मोजावे लागतात, तेवढेच पैसे साधारणत:  आता तुम्हाला एक किलो कोथिंबीरीसाठी मोजावे लागणार आहे. दरम्यान कोथिंबीर महागल्याने अनेक गृहिणींना रोजच्या स्वंयपाकातून कोथिंबिरीचा वापर कमी केल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात सर्वत्र पाऊस दाखल झाला असला, तरी नागपूरात नियमित पावसाचा खंड पडला आहे. त्यामुळे नागपूरातील कोथिंबीरीचे दर गगनाला भिडले आहे. कोथिंबीरीच्या दरवाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र कात्री लागणार आहे.

नागपूरात एक किलो चिकन किंवा मटणाचे दर साधारणत: 400 रुपये आहे. पण हाच दर सध्या नागपूरातील कोथिंबीरीला मिळतो आहे. नागपूरच्या बाजारात आवक कमी झाल्याने कोथिंबीरीचे दर गगनाला भिडले आहेत.  दरम्यान गेल्या काही वर्षातील कोथिंबीरीला मिळणारा हा सर्वाधिक दर असल्याचं म्हटलं जात आहे. दरम्यान यामुळे ग्राहकांना चांगलाचं फटका बसतो आहे.

सध्या बाजारात कोथिंबीरीची आवक कमी झाली आहे. त्यामुळे आम्हाला नांदेड, नाशिक या ठिकाणाहून कोथिंबीर मागवावी लागते. त्या ठिकाणाहून आयात करण्यासाठी फार जास्त पैसे मोजावे लागतात अशी प्रतिक्रिया नंदू पाटील या भाजी विक्रेत्याने दिली आहे.