Uma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन

| Updated on: Sep 27, 2020 | 10:31 AM

मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected Uma Bharati).

Uma Bharati : केदारनाथ यात्रेत उमा भारतींना कोरोना संसर्ग, हरिद्वारमध्ये क्वारंटाईन
Follow us on

भोपाळ : मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांना कोरोनाची लागण झाली आहे (Corona infected Uma Bharati). उत्तराखंड दौऱ्या दरम्यान त्यांनी केदारनाथचे दर्शनही घेतले होते. केदारनाथचे दर्शन करतानाचा व्हिडीओही त्यांनी पोस्ट केला होता. कोरोना झाल्याचे त्यांनी स्वत: ट्वीट करत माहिती दिली आहे. कोरोना झाल्यानंतर उमा भारती यांनी ऋषिकेश आणि हरिद्वारच्या दरम्यान वंदे मातरम कुंजमध्ये स्वत:ला क्वारंटाईन केलं आहे (Corona infected Uma Bharati).

“मी केदारनाथ दर्शनानंतर प्रशासनाकडे आग्रह करत कोरोना चाचणी पथकाला बोलावले. कारण मला तीन दिवस ताप होता. मी हिमालयात सोशल डिस्टन्सिगसह सर्व नियमांचे पालन केले. पण तरीही मला कोरोनाची लागण झाली आहे”, असं उमा भारती यांनी ट्वीट करत सांगितले.

“मी हरिद्वार आणि ऋषिकेषच्यामध्ये असलेल्या वंदे मातरम कुंजमध्ये क्वारंटाईन आहे. हे माझ्या कुटुंबासारखेच आहे. चार दिवसानंतर पुन्हा मी तपासणी करणार आहे आणि परिस्थिती अशीच असली तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पुढील निर्णय घेऊ. माझ्या संपर्कात आलेल्या इतरांनी सावधानी बाळगा आणि आपली कोरोना चाचणी करा”, असं आवाहनही उमा भारती यांनी केलं आहे.

मध्य प्रदेशातील पोटनिवडणुकीच्या प्रचारानंतर उमा भारती यात्रेसाठी हिमालयात गेल्या होत्या. यात्रा संपवून परत येताना मध्य प्रदेशच्या राजकारणात सक्रीय होणार होत्या. पण त्यापूर्वीच त्यांना कोरोनाची लागण झाली. मध्य प्रदेशातील सर्व नेत्यांनी उमा भारती लवकर बरे व्हावे यासाठी प्रार्थना केली आहे.

संबंधित बातम्या :

लस येण्याआधी कोरोनामुळे जगभरात 20 लाख नागरिकांचा मृत्यू होण्याची शक्यता, WHO चा इशारा

महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री