महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री

महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार असा निर्धार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. (To make Maharashtra the state with the highest health literacy in the country Says Cm Uddhav Thackeray)

महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार : मुख्यमंत्री

मुंबई : ‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी’ मोहीम तळागाळापर्यंत घेऊन जाण्यासाठी राज्यातील जिल्ह्यांनी नाविन्यपूर्ण मार्ग अवलंबिले आहेत. त्याचे कौतुक करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक आरोग्य साक्षरता असलेले राज्य बनवणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. (To make Maharashtra the state with the highest health literacy in the country Says Cm Uddhav Thackeray)

मुख्यमंत्र्यांनी मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातल्या जिल्ह्यांच्या कोव्हिड परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच ‘माझे कुटुंब , माझी जबाबदारी’ या महत्वाकांक्षी मोहिमेचा दर्जा चांगला ठेवून ती परिणामकारक करा यासाठी सूचना केल्या.

आज औरंगाबाद, नाशिक, नागपूर, अमरावती विभागातील जिल्ह्यांचे पालकमंत्री व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी झाले होते. मुख्यमंत्र्यांनी सर्व पालकमंत्र्यांना आपापल्या जिल्ह्यांच्या टास्क फोर्समधल्या डॉक्टर्सशी संवाद साधून वैद्यकीय उपचार आणि इतर उपायांच्याबाबतीत चर्चा करावी. पालक सचिव यांनीदेखील याबाबतीत तातडीने त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात समन्वयाच्यादृष्टीने पालकमंत्री आणि जिल्हा प्रशासन यांना संपर्कात राहावे, असे ते म्हणाले.

नाविन्यपूर्ण उपक्रमांचे मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

कोल्हापूर जिल्ह्याने ‘नो मास्क, नो एन्ट्री’ असा उपक्रम राबायला सुरुवात केली असून दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी यात सहभागी केले आहेत. गडचिरोली जिल्ह्याने या मोहिमेत महत्वाचा घटक असलेल्या आशा कार्यकर्तीला थँक्यू आशाताई असे पत्र देणे, असा उपक्रम राबवलाय. अकोला जिल्ह्यात नो मास्क, नो सवारी अशी मोहीम तसेच सर्व रिक्षांमध्ये मोहिमेची गाणी वाजविणे किंवा पोस्टर्स लावणे, लोक कलावंतांचा उपयोग करून घेणे, माजी सैनिकाना पथकांमध्ये सहभागी करून घेणे व लोकांना आरोग्य तपासनीस तयार करणे, असा उपक्रम राबवलाय.

औरंगाबाद जिल्ह्याने दवंडी पिटणे, सकाळी शहरातल्या घंटा गाड्यांमध्ये मोहिमेची आकर्षक जाहिरात करणे, नांदेडचे कोरोना विलगीकरण अभियान, बीडमधील मेळावे, सहव्याधी रुग्णांना शोधण्यावर नाशिकने दिलेला भर इत्यादी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम विविध जिल्हा प्रशासन राबवीत आहे. मुख्यमंत्र्यांनी याचे कौतुक केले आणि मोहीम मनापासून आणि दर्जेदार पद्धतीने चालवा अशीही सूचना केली.

आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवणे आवश्यक

सर्व विभागांमध्ये आरटी-पीसीआर चाचण्यांची संख्या वाढवणे खूप आवश्यक आहे. ज्यांची अँटीजन चाचणी निगेटीव्ह आली असेल, आणि लक्षण असतील त्यांची आरटी-पीसीआर चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठीच दोनदा स्वॅब घेण्याच्या सूचनाही आम्ही दिल्या आहेत. राज्यात दर दहा लक्ष लोकसंख्येमागे ४५ हजारपेक्षा जास्त आरटीपीसीआर चाचणी केली जाते. पण या ४ विभागातील काही जिल्ह्यांमध्ये त्यापेक्षा कितीतरी कमी चाचणी केली जाते ज्यामुळे संसर्ग वाढण्याचा धोका आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दंड वसुली काटेकोरपणे व्हावी

ब्रिटनमध्ये मास्क न वापरण्यांना मोठा दंड करणे सुरु केले आहे. त्यामुळे आपल्याकडेही आता बाहेर पडताना मास्क घातलाच पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी दंड करणेही आवश्यक असेल, तर तेही प्रभावीपणे केले पाहिजे असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

(To make Maharashtra the state with the highest health literacy in the country Says Cm Uddhav Thackeray)

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *