AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

क्राइम थ्रिलर सीरिज, एकदा बघण्यास सुरुवात केली तर सगळं विसराल, कुठे पाहू शकता?

अशी एक क्राइम सीरिज जे प्रेक्षकांना संपूर्ण एपिसोड होई पर्यंत एका जागेवर खेळवून ठेवते. प्रत्येक भागामध्ये सस्पेंस. शेवटचा भाग प्रचंड चर्चेत.

क्राइम थ्रिलर सीरिज, एकदा बघण्यास सुरुवात केली तर सगळं विसराल, कुठे पाहू शकता?
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 15, 2026 | 3:10 PM
Share

Mrs Deshpande Review: अभिनय, मोहक हास्य आणि अप्रतिम नृत्यकौशल्याने दशकानुदशके प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘धक-धक गर्ल’ माधुरी दीक्षितने ओटीटी विश्वात दमदार एन्ट्री केली होती. अशातच आता ती ‘मिसेस देशपांडे’ या सायकोलॉजिकल थ्रिलरमध्ये सिरीयल किलरच्या भूमिकेत दिसली आहे. दिग्दर्शक नागेश कुकुनूर यांनी त्यांच्या गोड स्मिताचा वापर या वेळी एक भयंकर शस्त्र म्हणून करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, दमदार संकल्पना असूनही कथानक आणि पटकथेच्या बाबतीत ही सीरिज अपेक्षित प्रभाव निर्माण करू शकत नाही.

कथेची सुरुवात एका उदयोन्मुख बॉलिवूड अभिनेत्याच्या हत्येने होते. हत्येची पद्धत अत्यंत विचित्र असते. नायलॉनच्या दोरीचा फास गळ्यात घालणे, पापण्यांना गोंद लावून डोळे उघडे ठेवणे आणि मृतदेह आरशासमोर बसवणे. या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबईचे पोलिस आयुक्त अरुण खत्री पुढे येतात. ही हत्या त्यांना 25 वर्षांपूर्वी पुण्यात घडलेल्या मालिकेतील खुनांची आठवण करून देते.

त्या वेळी ‘जीनत’ नावाने ओळखली जाणारी महिला माधुरी दीक्षित हैदराबादच्या तुरुंगात शिक्षा भोगत असते. तपासासाठी तिची मदत घेण्यासाठी तिला बाहेर आणले जाते. एसीपी तेजस फडके सिद्धार्थ चंद्रेकर याच्याकडे हे प्रकरण सोपवले जाते. दरम्यान, आणखी एक खून होतो आणि कथानक अधिक गुंतागुंतीचे बनते.

तपासादरम्यान समोर येते की ‘जीनत’चे खरे नाव सीमा देशपांडे आहे. आठ खुनांची कबुली देताना तिने आपली ओळख बदलण्याची अट ठेवली होती. तपास सुरू असताना मिसेस देशपांडे फरार होते; मात्र लवकरच तिला पुन्हा पकडले जाते. याच वेळी मोठा ट्विस्ट समोर येतो. सीमा हीच एसीपी तेजसची आई असते. मग हा ‘कॉपीकॅट किलर’ कोण आहे? आणि सीमा त्याला पकडण्यात कशी मदत करणार? कथा याच दिशेने पुढे सरकते.

माधुरीची उपस्थितीच मुख्य आकर्षण

काही मर्यादित ट्विस्ट वगळता संपूर्ण सीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा एकमेव घटक म्हणजे माधुरी दीक्षितचा अभिनय. तिचा स्क्रीन प्रेझेन्स प्रभावी असला तरी कमकुवत पटकथेचा भार त्या एकट्या पेलू शकत नाहीत. कागदावर रोचक वाटणारी ही थ्रिलर मालिका पडद्यावर तितकीशी साकार होत नाही. दमदार कल्पना आणि मोठ्या नावाची अभिनेत्री असूनही ‘मिसेस देशपांडे’ अपेक्षित उंची गाठण्यात अपयशी ठरते.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!

‘आमचं इथे व्यवस्थित चाललंय’, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!.

‘आमचं इथे व्यवस्थित चाललंय’, CJP च्या आंदोलनावर स्पृहा जोशीची कविता, लढ्याला थेट पाठिंबा!

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं.

देशभरातून स्विगी, झोमॅटोने विद्यार्थ्यांना जंतर मंतरवर जेवण पाठवतायेत लोकं