Pakistan-Iran : ‘जसे आलात, तसेच निघून जा’, पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरची इराणने इज्जत काढली
Pakistan-Iran : पाकिस्तानचा लष्करप्रमुख असीम मुनीरचा इराणमध्ये अपमान झालाय. त्याला आल्या पावली परत फिरायला सांगितलं. मुनीर यांचे हे शब्द ऐकताच इराणी अधिकारी भडकले.

अमेरिकेची वकिली करणं पाकिस्तानला महाग पडतय. बुधवारी इराणमध्ये पाकिस्तानचा लष्करप्रमुख आसिम मुनीरचा अपमान करण्यात आला. इराणच्या नव्या संरक्षण परिषदेचे प्रमुख मोहसेन रेजाई यांनी मुनीरला ज्या विमानाने ते तेहरानला पोहोचले होते, त्याच विमानाने पाकिस्तानला परत जायला सांगितलं. लेबनानी वर्तमानपत्र ‘अल-अखबार’ने याची पुष्टी केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा अल्टीमेटमचा संदेश घेऊन मुनीर रेजाई यांना भेटायला आलेले. इराणने आपला अणवस्त्र कार्यक्रम तात्काळ बंद करावा, असं त्यात म्हटलं होतं. मुनीर यांचे हे शब्द ऐकताच इराणी अधिकारी भडकले. त्यांनी मुनीर यांना पुन्हा पाकिस्तानात निघून जायला सांगितलं.
‘इराण इंटरनॅशनल’च्या रिपोर्टनुसार इराणने आपल्या अणवस्त्र कार्यक्रमाच्या चर्चेत लवचिकता दाखवावी असं मुनीर यांनी इराणला म्हटलं. त्यावर इराणने मुनीरला म्हटलं की, अमेरिकेला आमच्या अटी मान्य कराव्या लागतील. CNN-News18 ने आपल्या बातमीत रेजाई आणि मुनीर यांच्या बॉडी लँग्वेजचं विश्लेषण केलय. ही चर्चा खूप छोटी आणि औपचारिक असल्याचं म्हटलं. उत्साहावर्धक, सौहार्दपूर्ण राजकीय स्वागतासारखी कुठली गोष्ट दिसली नाही. रेजाई यांची भूमिका खूप संयमाची होती. चर्चेमध्ये रेजाई यांचे अनेक मुद्दे मुनीरला पटत होते. फुटेजमध्ये एक मोठा हँडशेक आणि आत्मीयतेने भेट अजिबात दिसली नाही.
मी अमेरिकेकडून शेवटचा इशारा घेऊन आलोय
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरने इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन आणि संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बागेर गालिबाफ यांच्याशी सुद्धा उच्च स्तरीय चर्चा केली. आमच्याकडे आता सांगण्यासारखं काही नवीन नाही असं गालिबाफ मुनीर यांना म्हणाले. मी अमेरिकेकडून शेवटचा इशारा घेऊन आलोय असं मुनीर, रेजाई यांना म्हणाल्याचं वृत्त अल-अखबारने दिलं आहे. मागण्या मान्य केल्या नाहीत तर इराणच्या अणवस्त्र ठिकाणांवर हल्ले होतील असा इशारा देण्यात आलाय. यात पिकएक्स माउंटेन साइट सुद्धा आहे.
