नशेसाठी कफ सिरपचा वापर, मुंबई पोलिसांकडून वर्षभरात 7000 बाटल्या जप्त

| Updated on: Jan 20, 2020 | 9:05 PM

अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) वर्षभरात फार कमी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे 7 हजार कफ सीरपच्या बाटल्या जप्त केल्या (cough syrup bottle seized)  आहेत.

नशेसाठी कफ सिरपचा वापर, मुंबई पोलिसांकडून वर्षभरात 7000 बाटल्या जप्त
Follow us on

मुंबई : तापमानामध्ये घट होत असल्याने सर्दी-खोकल्याच्या तक्रारी वाढू लागल्या (cough syrup bottle seized) आहेत. यामुळे औषधाच्या दुकानातील  कफ सिरपचा खपही वाढू लागला आहे. मात्र हा खप वाढण्यामागे केवळ सर्दी-खोकला हेच कारण नाही. तर कफ सिरपचा सर्वाधिक वापर नशेसाठी होत असल्याने त्यांची विक्री वाढली आहे. कफ सीरपच्या बेकायदा विक्रीप्रकरणी ठोस कारवाईची गरज आहे. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून (एफडीए) वर्षभरात फार कमी कारवाई करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी वर्षभरात सुमारे 7 हजार कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या (cough syrup bottle seized)  आहेत.

मुंबईमध्ये स्थानिक पोलिस ठाणे, तसेच अंमली पदार्थविरोधी पथकांनी असे पदार्थ पुरविणाऱ्यांविरोधात कंबर कसली आहे. त्यामुळे ते सहज मिळणे कठीण झाले आहे. यामुळे नशेबाजांनी प्रतिबंधित औषधांचा डोस घेण्याकडे आपला मोर्चा वळविला आहे. केमिस्टमध्ये कफ सिरप हे प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्वाधिक विक्री होणारे औषध आहे.

नशेसाठी कफ सिरपची विक्री करणाऱ्यांवर पोलिस आणि एफडीएकडून कारवाई करण्यात येते. विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एफडीएने 2019 मध्ये अशा केवळ दोन-तीन कारवाई केल्या आहेत. त्यामध्ये जप्त करण्यात आलेला साठाही नगण्य आहे. ही नेमकी कारवाई किती? याबाबत एफडीएच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता माहिती मिळू शकली नाही. मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी पथकाने मात्र 2019 मध्ये 7 हजार कफ सिरपच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. तर 11 जणांना अटक केली आहे.

कफ सिरप हे औषध म्हणून घेतल्यास त्याचे प्रमाण ठराविक असते. पण नशेसाठी दोनशे मिलीची संपूर्ण बाटली तरुण पितात. हे सिरप तात्काळ परिणाम दाखवते. ड्रग्जप्रमाणे उत्तेजित करते. त्यानंतर शरीर सुस्त करते. सिरप अधिक प्रमाणात घेतल्यास ही धुंदी झोप आणते. त्यामुळे आपल्या घरातील तरुण-तरुणी वारंवार कफ सिरप घेत असल्यास वेळीच सावध व्हा, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले (cough syrup bottle seized)  आहे.

कफ सिरप का?

-कफ सिरप केमिस्टकडे सहज मिळते
-अनेक केमिस्ट प्रीस्क्रिप्शन विचारत नाहीत
-ओळखीच्या केमिस्टकडून तर अजिबात विचारणा होत नाही
-खोट्या प्रीस्क्रिप्शनची शहानिशा केली जात नाही
-पोलिसांच्या तावडीत सापडण्याची शक्यता कमी
-सर्दी, खोकल्याचे कारण दिल्याने घरच्यांनाही संशय येत नाही
-दारू किंवा ड्रग्जप्रमाणे दुर्गंधी येत नाही.