धार्मिक कार्यक्रमात फटाक्यांच्या ट्रॉलीला आग, 14 जणांचा मृत्यू

| Updated on: Feb 08, 2020 | 7:43 PM

शीख समाजाच्या नगर किर्तन या धार्मिक कार्यक्रमादरम्यान एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोठा स्फोट (Tarn Taran firecracker explosion blast) झाला आहे.

धार्मिक कार्यक्रमात फटाक्यांच्या ट्रॉलीला आग, 14 जणांचा मृत्यू
Follow us on

चंदिगड (पंजाब) : शीख समाजाच्या नगर किर्तन या धार्मिक कार्यक्रमादरम्यान एका ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये मोठा स्फोट (Tarn Taran firecracker explosion blast) झाला आहे. यात जवळपास 14 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात ही घटना घडली. कार्यक्रमासाठी फटाके ठेवलेल्या ट्रक्टरच्या ट्रॉलीला अचानक आग लागल्याने ही घटना घडल्याचं समोर येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नगर किर्तन या धार्मिक कार्यक्रमाचे पंजाबच्या तरनतारन जिल्ह्यात जोरदार सेलिब्रेशन सुरु होते. या धार्मिक कार्यक्रमासाठी अनेक लोक पहुविंड ठिकाणाहून गुरुद्वाऱ्यात जाण्यासाठी रवाना झाले. यादरम्यान एका ट्रॅक्टरवर फटाके ठेवले होते. मात्र अचानक त्या ट्रॅक्टरला आग लागली. या भीषण आगीत ट्रॅक्टरवरील फटाके फुटले आणि भीषण स्फोट झाला. या स्फोटात 14 जणांचा मृत्यू झाला.

या स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी लगेचच घटनास्थळी धाव घेतली. या घटनेतील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. पोलीस या घटनेची चौकशी करत आहे.

तरनतारन जिल्ह्याचे पोलीस अधिकारी ध्रुव दहिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, या स्फोटात आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जखमींमधील तिघांची प्रकृती गंभीर (Tarn Taran firecracker explosion blast) आहे.