भात झडले, सोयाबीन आडवे, कापसाची बोंड सडली, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान

| Updated on: Nov 01, 2019 | 5:40 PM

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोकण, पुणे, सातारा, सांगली, नागपूर या ठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत (crop damage due to rain) आहे.

भात झडले, सोयाबीन आडवे, कापसाची बोंड सडली, शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान
Follow us on

मुंबई : अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटाजवळ निर्माण झालेल्या महाचक्रीवादळाचा फटका सध्या मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला बसत आहे. चक्रीवादळामुळे मुंबईत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी (crop damage due to rain) बरसल्या. तर गेल्या काही दिवसांपासून कोकण, पुणे, सातारा, सांगली, नागपूर यासह राज्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. यामुळे शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान झाल्याचे पाहायला मिळत (crop damage due to rain) आहे.

राज्यात एकीकडे भाजपा शिवसेना महायुतीत सता स्थापनेवरून संघर्ष सुरु आहे. तर दुसरीकडे परतीच्या पावसाने शेतकरी हवालदिल झाला आहे. परतीच्या पावसामुळे सोयाबीन, कपाशी यांसह इतर पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करुन आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी सरकारकडे केली आहे.

फळबागांसह कापसाला परतीच्या पावसाचा फटका

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी सलग 10 ते 12 दिवस परतीचा पाऊस कोसळत आहे. त्यामुळे मोसंबी, संत्री यासह इतर फळबाग उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहेत. घनसावंगी तालुक्यातील शिंदे वडगाव जवळील फळबागा उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. तसेच परतीच्या पावसाने कापूस आणि सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कापसाच्या पिकांची पाने गळून पडली असून तर काही ठिकाणी पिकांची पाने पिवळी पडली आहेत. तर काही ठिकाणी कापसाची बोंडे सडून चालली (crop damage due to rain) आहेत.

सोयाबीन, भात शेतीचेही नुकसान

सोयाबीन पिकाच्या काढणीदरम्यान सतत पाऊस पडत असल्याने सोयाबीनचे दाणे रानात पडल्याचे पाहायला मिळत आहेत. तर काही दाण्यांना कोंब फुटले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे 70 ते 80 टक्के नुकसान झाले असून शासनाने तातडीने मदत करावी अशी मागणी जोर धरु लागली आहे.

कोकणासह तलासरी, डहाणू, बोईसर, कासा इत्यादी भागात परतीच्या पावसाने भात शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हाती आलेलं पीक पूर्णतः खराब झाले आहे.

राज्यात दुष्काळामुळे आधीच अडचणीत आलेले शेतकरी आता अतिवृष्टीमुळे हैराण झाला आहे. सोयाबीन, कांदा, कोथिंबीर, मूग-उडीद, भुईमुग अशी अनेक पिकं पावसाने होत्याची नव्हती केली आहेत. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणीही शेतकऱ्यांकडून करण्यात येत (crop damage due to rain) आहे.

संत्री, द्राक्षेही गळून पडली

जगभरात प्रसिद्ध असलेल्या नागपूरच्या संत्रीलाही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे. तीन-चार दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे हाता-तोंडाशी आलेली संत्री गळायला लागली आहे. अवकाळी पाऊस आणि बदललेल्या वातावरणामुळे विक्रीस तयार असलेला झाडावरील 25 टक्क्यांपेक्षा जास्त संत्री गळून खाली पडली आहे. नागपूर, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यातील संत्राउत्पादक अवकाळी पावसामुळे संकटात सापडले आहेत.

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका सटाणा, मालेगाव, नांदगाव, निफाड, येवला, चांदवड, सिन्नर आणि देवळा या तालुक्यात झाल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिकमधील द्राक्षांच्या बागांनाही याचा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे. पिकनिहाय विचार केल्यास मका या पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले आहे. तर बाजरी या पिकाचा पेरा 1.10 लाख हेक्टर होता. त्याचे 50 ते 60 टक्के नुकसान झालेले (crop damage due to rain) आहे.

दरम्यान अरबी समुद्रात लक्षद्वीपजवळ महा चक्रीवादळ निर्माण झाले आहे. यामुळे राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळणार आहे. परिणामी बाष्पयुक्त ढगांची निर्मिती होणार असून राज्यातील शहरात पुढील दोन दिवस मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडेल, अशी शक्यता पुणे वेधशाळेने व्यक्त केली आहे.