उष्माघाताने 3 दिवसाच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू?

| Updated on: Jun 01, 2019 | 3:47 PM

वर्धा : एकीकडे तापमानाचा पारा उच्चांक गाठतो आहे, तर दुसरीकडे वाढते तापमान नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करताना दिसत आहे. समुद्रपूर तालुक्यात मागील 15 दिवसात 4 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुद्रपूरमधील कोरा येथे 3 दिवसाच्या चिमुकलीचा 5 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी (31 मे) संध्याकाळी तिच्या आईचाही मृत्यू झाला. दोघींचाही मृत्यू […]

उष्माघाताने 3 दिवसाच्या चिमुकलीसह आईचा मृत्यू?
Follow us on

वर्धा : एकीकडे तापमानाचा पारा उच्चांक गाठतो आहे, तर दुसरीकडे वाढते तापमान नागरिकांच्या आरोग्यावर मोठा परिणाम करताना दिसत आहे. समुद्रपूर तालुक्यात मागील 15 दिवसात 4 लोकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. समुद्रपूरमधील कोरा येथे 3 दिवसाच्या चिमुकलीचा 5 दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता. त्यानंतर शुक्रवारी (31 मे) संध्याकाळी तिच्या आईचाही मृत्यू झाला.

दोघींचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. शव विच्छेदन अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होईल. रसिका कैलास नारनवरे असे मृत महिलेचे नाव आहे. 22 मे रोजी रसिकाला प्रसूतीसाठी वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. 23 मे रोजी तिने एका चिमुकलीला जन्म दिला. 26 मे रोजी तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

शुक्रवारी समुद्रपूर तालुक्यातील मंगरुड येथे आपल्या माहेरी असताना रसिकाची सांयकाळच्या सुमारास प्रकृती ढासळली. तिला तीव्र ताप आल्याने ती अस्वस्थ होऊ लागली. घरच्यांनी तिला लगेचच गिरड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणले. मात्र, उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला. तिचाही मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे.