मुलीला त्रास दिल्यानं जावयासह सासूला जबर मारहाण, जखमी सासूचा 5 दिवसांनंतर मृत्यू

| Updated on: Jan 23, 2020 | 10:53 PM

पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे मुलीला त्रास देतात, नांदवत नाहीत, जाच करतात म्हणून माहेरच्या लोकांनी जावयाला आणि त्याच्या आईला जबर मारहाण केली (Death of mother in law in pandharpur).

मुलीला त्रास दिल्यानं जावयासह सासूला जबर मारहाण, जखमी सासूचा 5 दिवसांनंतर मृत्यू
Follow us on

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे मुलीला त्रास देतात, नांदवत नाहीत, जाच करतात म्हणून माहेरच्या लोकांनी जावयाला आणि त्याच्या आईला जबर मारहाण केली (Death of mother in law in pandharpur). या मारहाणीमुळे जखमी झालेल्या सासूचा 5 दिवसांनी मृत्यू झाला. या प्रकरणी मुलीच्या कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सासरच्या लोकांवर हल्ला करणाऱ्या आरोपींमध्ये बळीराम गांडुळे (मुलीचे वडील), श्रीकांत गांडुळे, दत्तात्रय गांडुळे, लक्ष्मण गांडुळे, चिमाजी गांडुळे, हणुमंत गांडुळे, नाना गुंड, सोमनाथ गांडुळे, समाधान गांडुळे यांचा समावेश आहे. हे सर्व तनाळी रोडवरील देशमुख वस्ती येथील रहिवासी आहेत. त्यांनी दुपारच्या सुमारास जावई शहाजी गंड यांच्या घरावर हल्ला करत त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. आरोपी श्रीकांत गांडुळे याने शहाजी गुंड यांची आई सुनिता गुंड यांच्या पाठीवर, हातावर आणि पोटावर मोटार केबल आणि पाईपने जबर मारहाण केली. यात शहाजी गंड यांची आई गंभीर जखमी झाल्या. त्यांच्याअंगावरील सोन्याचे 3 तोळ्याचे गंठण, बोरमाळ आणि शहाजी यांचा मोबाईलही आरोपींनी हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या सुनिता नारायण गुंड यांचा 5 दिवसांनंतर उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दरम्यान, शहाजी गुंड यांच्या पत्नीने याआधीही सासरचे लोक छत्र करतात म्हणून विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही 2 ते 3 वेळा अशाचप्रकारे सासरच्या लोकांना मारहाण झाली होती. मात्र, यावेळी झालेल्या वादाने सासूला आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ओलेकर करत आहेत.