‘निर्भया’च्या मारेकऱ्यांची फाशी लांबली, तारीख बदलली

| Updated on: Jan 17, 2020 | 5:23 PM

देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कारातील नराधमांविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आले (Death penalty to accused of nirbhaya rape case) आहे.

निर्भयाच्या मारेकऱ्यांची फाशी लांबली, तारीख बदलली
Follow us on

नवी दिल्ली : देशाला हादरवून सोडणाऱ्या दिल्लीतील निर्भया बलात्कारातील नराधमांविरोधात नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आले (Death penalty to accused of nirbhaya rape case) आहे. येत्या 1 फेब्रुवारीला सकाळी 6 वाजता चारही दोषींना फासावर लटकवण्यात येणार आहे. दिल्ली कोर्टाने याबाबतचा निर्णय दिला आहे.

यापूर्वी 22 जानेवारीला सकाळी सात वाजता निर्भयाचे चारही मारेकरी फासावर लटकवलं जाणार होतं. मात्र त्यानंतर दोषी असलेल्या मुकेशने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यांकडे दया याचिकेची मागणी केली होती. मात्र राष्ट्रपतींनी ही याचिका फेटाळत फाशीची शिक्षा कायम ठेवली (Death penalty to accused of nirbhaya rape case) होती. त्यानुसार अक्षय ठाकूर (31), पवन गुप्ता (25), मुकेश सिंह (32) आणि विनय शर्मा (26) नवं डेथ वॉरंट जारी करण्यात आलं आहे. त्यानुसार तिहार तुरुंगात चारही दोषींना 1 फेब्रुवारीला सकाळी सहा वाजता एकाच वेळी फाशी दिली जाईल.

जेल नंबर तीनमध्ये चौघाही दोषींना फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. उत्तर प्रदेशातील जल्लाद चौघांना एकामागून एक फासावर लटकवेल. या कुटुंबात पिढ्यान् पिढ्या हेच काम केले जाते. मात्र निर्भयाच्या दोषींना फासावर लटकवणारी व्यक्ती पहिल्यांदाच जल्लाद म्हणून काम करणार आहे.

16 डिसेंबर 2012 रोजी 6 नराधमांनी निर्भयावर गँगरेप केला होता. या प्रकाराने संपूर्ण देश हादरला होता. या पाशवी बलात्कारानंतर निर्भयाची प्रकृती बिघडली होती. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला होता. नऊ महिन्यांनंतर सप्टेंबर 2013 मध्ये कनिष्ठ कोर्टाने दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. मार्च 2014 मध्ये उच्च न्यायालयाने आणि मे 2017 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली (Death penalty to accused of nirbhaya rape case) होती.

तिहार प्रशासन सज्ज

तिहार तुरुंगात चौघांच्या फाशीची तयारी पूर्ण झाली आहे. दोषींच्या डमींना रविवारी फाशी देऊन रंगीत तालीम करण्यात आली होती. प्रत्येक दोषीच्या वजनाइतकी दगड-मातीने भरलेली पोती फासावर लटकवून तयारी करण्यात आली. पोत्याला गळफास लावून दोरीची क्षमता तपासण्यात आली. जल्लादाला न बोलावता तुरुंगातील अधिकाऱ्यांनीच फाशीची प्रक्रिया (Nirbhaya convicts Curative petitions) पूर्ण केली होती.

16 डिसेंबरची काळरात्र 

16 डिसेंबरच्या रात्री पॅरामेडिकलची विद्यार्थीनी निर्भया आणि तिचा मित्र दिल्लीतील एका मॉलमधून सिनेमा पाहून घरी परतत होते. यावेळी घरी जाण्यासाठी ते एका बसमध्ये चढले. त्या बसमध्ये आधीपासूनच चालकासह सहा जण होते. बस सुरु झाल्यावर त्या सहा जणांनी निर्भयाोसबत छेडछाड करायला सुरुवात केली. त्यावेळी तिच्या मित्रानं त्यांना विरोध केला. मात्र आरोपींनी मित्राला बेदम मारहाण केली. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. त्यानंतर या सहा जणांनी निर्भयावर बसमध्येच बलात्कार केला. तसेच तिला अमानुष मारहाणही केली. त्यामुळे ती गंभीररित्या जखमी झाली होती.