आधी महिला उपनिरीक्षकाची हत्या, मग बॅचमेटची गोळी झाडून आत्महत्या

| Updated on: Feb 08, 2020 | 10:50 AM

महिला उपनिरीक्षकाची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली. हे दोघेही बॅचमेट असल्याची माहिती आहे.

आधी महिला उपनिरीक्षकाची हत्या, मग बॅचमेटची गोळी झाडून आत्महत्या
Follow us on

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये विधानसभा निवडणुकांच्या आदल्या रात्री एका महिला उपनिरीक्षकाची गोळी मारुन हत्या करण्यात आली होती (Delhi Woman PSI Murder). या प्रकरणी आता एक नवा खुलासा झाला आहे. या महिला उपनिरीक्षकाला गोळी घालणारा व्यक्ती हा देखील दिल्ली पोलीसमध्ये उपनिरीक्षक पदावर कार्यरत होता. महिला उपनिरीक्षकाची हत्या केल्यानंतर त्याने स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली. हे दोघेही बॅचमेट असल्याची माहिती आहे (Delhi Woman PSI Murder).

माहितीनुसार, प्रितीा अहलावत नावाच्या महिला उपनिरीक्षकाला गोळी मारणारा व्यक्तीही एक पोलीस उपनिरीक्षक होता. त्याचं नाव दिपांशू राठी होतं. तो दिल्लीच्या भजनपुरा पोलीस ठाण्यात उपनिरिक्षक पदावर कार्यरत होता. प्रिती यांना गोळी मारल्यानंतर दिपांशूने हरियाणाच्या सोनिपत येथे स्वत:वर गोळी घालून आत्महत्या केली. प्रिती आणि दिपांशू या दोघांनीही 2018 मध्ये दिल्ली पोलीसमध्ये भर्ती झाली होती.

प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. तरी पोलीस सर्व पुराव्यांची शहानिशा करुन हत्या आणि आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.

दिल्लीत महिला उपनिरीक्षकाची गोळ्या घालून हत्या

विधानसभा निवडणुकांसाठी आज दिल्लीमध्ये मतदान होत आहे. मात्र, यापूर्वी आदल्या रात्री रोहिणी परिसरात महिला उपनिरीक्षक प्रिती अहलावत यांची हत्या करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिती अहलावत या शुक्रवारी रात्री 9.30 च्या सुमारास रोहिणी ईस्ट मेट्रो स्टेशनवरुन पायी आपल्या घरी जात होत्या. यावेळी एका अज्ञात हल्लेखोराने प्रिती यांच्यावर तीन गोळ्या चालवल्या आणि या घटनेत प्रिती यांचा मृत्यू झाला. प्रिती अहलावत या दिल्लीच्या पटपडगंज इंडस्ट्रिअल परिसरातील पोलीस ठाण्यात उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होत्या.