आम्ही जगायचं कसं? मंगल कार्यालयावर अवलंबून असलेल्या अनेक घटकांचा राज्य सरकारला सवाल

| Updated on: Oct 20, 2020 | 3:37 PM

अनलॉक 5 मध्ये राज्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सुरु करण्यास परवानगी देण्यात आली. पण मोठ्या लग्न समारंभांना अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे मंगल कार्यालयांवर अवलंबून असलेल्या घटकांवर उपासमारीची वेळ आलीय. या घटकांनी सरकारला आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आम्ही जगायचं कसं? मंगल कार्यालयावर अवलंबून असलेल्या अनेक घटकांचा राज्य सरकारला सवाल
Follow us on

शिर्डी: कोरोना संकटात अनेक छोट्या-मोठ्या उद्योग-व्यवसायांवर गंडांतर आलं. मात्र, अनलॉकला सुरुवात झाल्यानंतर राज्यातील बार, रेस्टॉरंट, हॉटेल्स, ग्रंथालयं सुरु करण्यात आली आहेत. पण मंगल कार्यालयं आणि लॉन्स सुरु करण्यास राज्य सरकारनं अद्याप परवानगी दिलेली नाही. त्यामुळं एका लग्नावर अवलंबून असलेले समाजालातील जवळपास 24 घटक सध्या उपासमारीचा सामना करत आहेत. त्यात मंगलसेवा, वाजंत्री, ऑर्केस्ट्रा, फोटोग्राफर, डेकोरेटर्स अशा अनेकांचा समावेश आहे. (Demand to starts weddings halls in state )

मंगल कार्यालयावर अवलंबून असलेल्या २४ घटकांची आज संगमनेरमध्ये बसंत लॉन्स इथं राज्यव्यापी बैठक पार पडली. राज्य सरकारनं मंगल कार्यालयं आणि लॉन्सवरील निर्बंध उठवले नाहीत तर आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला आहे. अनलॉकमध्ये लग्न कार्याला ५० ऐवजी 500 ते 1000 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी आता करण्यात येत आहे. सरकारनं आपल्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा असोसिएशनचे अध्यक्ष गोरख कुटे यांनी दिला आहे.

अनलॉक 5 मध्ये काय सुरु?

  • मुंबई मेट्रो
  • ग्रंथालय
  • गार्डन, पार्क्स
  • व्यावासायिक प्रदर्शने (बिझनेस टू बिझनेस एक्झिबिशन्स)
  • स्थानिक आठवडा बाजार, गुरांचा बाजारालाही परवानगी
  • केंद्रीय गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्यांना आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुभा
  • पीएचडी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचं शिक्षण घेणाऱ्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि तंत्रशिक्षण, लॅबोरटरीशी संबंधितांना 15 ऑक्टोबरपासून शिक्षण संस्थेत उपस्थितत राहण्यात मुभा
  • ऑनलाईन आणि दूरस्थ शिक्षणाला परवानगी देण्यात आली आहे (Mumbai Metro And Library)
  • शाळेतील 50 टक्के शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना 15 ऑक्टोबरपासून शाळेत बोलावण्यास परवानगी
  • उच्च शिक्षण संस्थांचं ऑनलाइन प्रशिक्षण सुरुच राहील

काय बंद?

  • शाळा, महाविद्यालये, कोचिंग क्लासेस 31 ऑक्टोबरपर्यंत बंद बंद
  • सिनेमा हॉल, स्वीमिंग पूल, मनोरंजन पार्कस, थिएटर सभागृहे 31 ऑक्टोबरपर्यंत बंद
  • सामाजिक, राजकीय कार्यक्रम, खेळाच्या स्पर्धा तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांना बंद

संबंधित बातम्या:

अनलॉकनंतर 7 महिन्यांनी मोनोरेल पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत

Demand to starts weddings halls in state