ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाचा पहिल्या महायुद्धावर सिनेमा, ‘1917’चा धडाकेबाज ट्रेलर

| Updated on: Aug 06, 2019 | 7:20 PM

‘स्कायफॉल’, ‘स्पेक्टर’ आणि ‘अमेरिकन ब्युटी’ यांसारख्या चित्रपटांचे ऑस्कर विजेता दिग्दर्शक सॅम मेंडेस आता '1917' हा पहिल्या महायुध्दावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत.

ऑस्कर विजेत्या दिग्दर्शकाचा पहिल्या महायुद्धावर सिनेमा, 1917चा धडाकेबाज ट्रेलर
Follow us on

मुंबई : ‘स्कायफॉल’, ‘स्पेक्टर’ आणि ‘अमेरिकन ब्युटी’ यांसारख्या चित्रपटांचे ऑस्कर विजेता दिग्दर्शक सॅम मेंडेस आता ‘1917’ हा पहिल्या महायुध्दावर आधारित सिनेमा घेऊन येत आहेत. भारतात रिलायन्स इंटरटेन्मेंट या सिनेमाला प्रदर्शित करणार असून त्यांनीच ट्विटरद्वारे या सिनेमाचा ट्रेलर लाँच केला आहे.

पहिल्या महायुध्दादरम्यान दोन युवा ब्रिटिश सैनिक स्कोफील्ड आणि ब्लेकला यांना एक मिशन दिलं जातं. असंभव असं हे मिशन हे दोघं सैनिक पार पाडतात. याचं चित्तथरारक चित्रण या चित्रपटात दिसणार आहे. रिचर्ड मेडन, बेनडिक्च कंबेरबॅच, डिन चार्लेस, जॉर्ज मॅके, मार्क स्ट्राँग, डॅनियल मायस या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. सॅम मेंडेस यांच्यासह क्रिस्टी विल्सन-केयनर्ससोबत या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे.

येत्या 10 जानेवारी 2020 मध्ये मोठ्या स्केलवर हा चित्रपट भारतात प्रदर्शित होणार आहे. आता बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा काय धमाल करतो हे बघणं इंटरेस्टिंग ठरणार आहे.

पाहा ट्रेलर :