कोरोना योद्धा शिक्षकांना उपचारासाठी कागदपत्रंची सक्ती नको, शिक्षिकेच्या व्यथेचा व्हीडिओनंतर मनसे आमदारांची मागणी

| Updated on: Nov 04, 2020 | 9:05 PM

सरकारने या संदर्भात लवकरात लवकर परिपत्रक काढून न्याय द्यावा अशी मागणी मनसेचा आमदार राजू पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे.

कोरोना योद्धा शिक्षकांना उपचारासाठी कागदपत्रंची सक्ती नको, शिक्षिकेच्या व्यथेचा व्हीडिओनंतर मनसे आमदारांची मागणी
Follow us on

डोंबिवली : कोराना योद्धा शिक्षकांना उपचार घेताना कागदपत्रंची सक्ती केली जात आहे. त्यांना उपचार घेताना अडचणी येत आहे. सरकारने या संदर्भात लवकरात लवकर परिपत्रक काढून न्याय द्यावा अशी मागणी मनसेचा आमदार राजू पाटील यांनी आरोग्य मंत्र्यांकडे केली आहे. याच प्रकरणासंबंधी एका शिक्षिकेचा व्यथेचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. (dont take documents from Corona warrior teachers for treatment MNS MLAs demand)

डोंबिवलीत राहणाऱ्या प्रज्ञा कुलकणी या महिला शिक्षिका आहे. कोरोना काळात त्यांनी इतर शिक्षकांप्रमाणोच सर्वेक्षणाचं काम केलं. 5 मे ते 14 जून असं 40 दिवस त्यांनी कोरोना सर्वेक्षणाचं काम केलं. त्यानंतर पुन्हा 24 सप्टेंबर रोजी काम सुरू केले. पण यानंतर 11 ऑक्टोबर रोजी कुलकर्णी यांना खोकल्याचा त्रस जाणवू लागला. यानंतर कोरोना झाल्याचं समोर आलं. पण यासाठी पालिकेतच्या अनेक कागदपत्रांसाठी आग्रह केल्याची तक्रार त्यांनी व्हीडिओतून केली आहे.

मिळालेल्या माहितनुसार, प्रज्ञा यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्या घरातही कोरोनाचा शिरकाव झाला. त्यांच्या सासूबाईंनाही कोरोना झाला. यानंतर दोघीही कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुग्णालयात उपचारासाठी गेल्या असता त्यांच्याकडे अनेक कागदपत्रांसाठी आग्रह करण्यात आला.

झेरॉक्स दिल्यावर ओरीजलन कागदपत्रे आणा असा आग्रह करण्यात आला. या सगळ्याचा मनस्ताप त्यांच्यासह त्यांच्या सासूबाईंना झाला. साईबाई या 70 वर्षांच्या असल्याने त्या तर सगळी धावपळ करू शकत नव्हत्या. कोरोना काळात जीवाची पर्वा न करता सर्वेक्षण करणाऱ्या शिक्षिकेला अशा प्रकारे मनस्ताप करावा लागतो याचा व्हीडीओ कुलकर्णी यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या घटनेची दखल घेत मनसे आमदार राजू पाटील यांनी शिक्षकांना कागदपत्रंची सक्ती न करता उपचारासाठी विशेष सवलत दिली जावी अशी मागणी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली आहे. यावर आरोग्यमंत्री काय निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.

इतर बातम्या –

चप्पूवरुन प्रवास करताना तिघांचा मृत्यू, त्याच चप्पूवरुन प्रवास करून आमदार धस यांचा कुटुंबाला धीर
ट्विटर नंतर फेसबुकचाही डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा ठपका

(dont take documents from Corona warrior teachers for treatment MNS MLAs demand)