ट्विटर नंतर फेसबुकचाही डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा ठपका

मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्याकडून निवडणूक निकाल प्रभावित केला जात असल्याचा आरोप केला आहे. फेसबुकवर त्यांनी तशी पोस्ट केली आहे.मात्र, ट्रम्प यांच्या पोस्टची दखल घेत फेसबुकने ट्रम्प यांना चांगलाच झटका दिला आहे.

ट्विटर नंतर फेसबुकचाही डोनाल्ड ट्रम्प यांना झटका; दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याचा ठपका

2020 US election results | वॉशिंग्टन : अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडीसाठीची मतमोजणी अजूनही सुरु आहे. डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन आणि रिपब्लिन पक्षाचे उमेवार विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. अशात मतमोजणी सुरु असताना डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडन यांच्याकडून निवडणूक निकाल प्रभावित केला जात असल्याचा आरोप केला आहे. फेसबुकवर त्यांनी तशी पोस्ट केली आहे. मात्र, ट्रम्प यांच्या पोस्टची दखल घेत फेसबुकने ट्रम्प यांना चांगलाच झटका दिला. ट्रम्प यांच्याकडून दिशाभूल करणारी माहिती पसरवली जात असल्याचे सांगत निवडणुकीचे निकाल वेगळे असू शकतात असं फेसबुकने सांगितलं आहे. (after the twitter facebook also labeled the facebook post of donald trump)

ट्रम्प यांनी फेसबुक पोस्टमध्ये ‘आपण मोठ्या संख्येने आहोत. पण विरोधक निवडणुकीचे निकाल प्रभावित करु पाहत आहेत. आपण त्यांना असे करु देणार नाही.’ असं  म्हटलं आहे.

ट्रम्प यांनी ही पोस्ट करताच फेसबुकने त्यांना चांगलाच झटका दिला आहे. फेसबुकने ट्रम्प यांच्या पोस्टवर लेबल लावले आहे. यामध्ये ‘निकालाचे निष्कर्ष सुरुवातीच्या मतमोजणीपेक्षा वेगळे असू शकतात. बॅलेटमार्फत मतदान केलेल्या मतांची मोजणी अजूनही सुरु आहे. त्यासाठी किमान काही आठवडेही लागू शकतात,’ असं फेसबुकने सांगितलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरही अशाच आशयाचे ट्वीट केले होते. त्यानंतर ट्विटरनेदेखील त्यांच्या ट्वीटला लेबल लावत ट्वीटमधील काही दावा विवादित असू शकतो, असं सांगितलं होतं.

दरम्यान, अमेरिकेत अजूनही मतमोजणी सुरु आहे. बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चुरशीची लढत होत आहे. जो बायडन सध्या आघाडीवर आहेत. जो बायडन यांना 238 इलेक्टोरल वोट मिळाले आहेत. तर, डोनाल्ड ट्रम्प 213 वोट्स मिळवून 25 वोट्सने पिछाडीवर आहेत.

संबंधित बातम्या :

US Election 2020 : ‘विजेत्याची घोषणा करणं मतदारांचं काम’, निकालापूर्वीच बायडन-ट्रम्पमध्ये ट्विटर वॉर

Joe Biden | ट्रम्प यांच्याशी कडवी झुंज; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

ट्रम्प यांच्याशी कडवी झुंज; जाणून घ्या कोण आहेत जो बायडन?

(after the twitter facebook also labeled the facebook post of donald trump)

Published On - 8:27 pm, Wed, 4 November 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI