AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अमेरिकेच्या सैनिकांसोबत इराणचं भयंकर कृत्य, त्या दाव्याने डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली; जगात खळबळ!

War Update : इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारा दावा केला आहे. यामुळे संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे.

अमेरिकेच्या सैनिकांसोबत इराणचं भयंकर कृत्य, त्या दाव्याने डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडाली; जगात खळबळ!
donald Trump and iran warImage Credit source: Google
| Updated on: Mar 08, 2026 | 3:39 PM
Share

मध्य पूर्वेत भीषण युद्ध सुरू आहे. अमेरिका आणि इस्रायलकडून इराणवर सतत हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांना इराणकडूनही प्रत्युत्तर दिले जात आहेत. अशातच आता इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेचे सचिव अली लारिजानी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची झोप उडवणारा दावा केला आहे. अलीकडील संघर्षादरम्यान अनेक अमेरिकन सैनिकांना इराणी सैन्याने कैद केले आहे आणि अमेरिका ही बाब लपवण्याचा प्रयत्न करत आहे असा दावा लारिजानी यांनी केला आहे. त्यामुळे आता संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

अनेक अमेरिकन सैनिकांना अटक

फेब्रुवारीच्या अखेरपासून अमेरिका आणि इस्त्रायलने इराणवर हल्ले सुरू केले आहेत. याला प्रत्युत्तर देताना इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने अनेक संवेदनशील ठिकाणांना लक्ष्य करत शेकडो बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे प्रतिहल्ले केले आहेत. या कारवाईत काही अमेरिक सैनिकांना अटक करण्यात आल्याचेही समोर आले आहे. एक्सवर केलेल्या एका पोस्टमध्ये लारिजानी यांनी म्हटले की, ‘अनेक अमेरिकन सैनिकांना अटक करण्यात आली आहे. मात्र अमेरिका हे सैनिक युद्धात मारले गेल्याचे सांगत आहे, पण ही सत्यता जास्त काळ लपवता येणार नाही.’

इराण अमेरिकेला उत्तर देणार

अली लारिजानी यांनी एक दिवस आधी अमेरिकेला इशारा दिला होता की, प्रत्येक कारवाईला प्रत्युत्तर दिले जाईल. अमेरिकेने हे समजून घ्यावे की इराणच्या संयमाची परीक्षा घेणे आणि आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करणे याचे गंभीर परिणाम होतील. राष्ट्रीय निर्धाराच्या बळावर इराण अमेरिकन आक्रमकतेला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आणि अमेरिकेला त्यासाठी जबाबदार धरले जाईल.

अनेरिकेचे उद्दिष्ट साध्य झाले नाही

लारिजानी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, ट्रम्प यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते की, इराणविरोधातील अमेरिकेची व्यापक रणनीती अपयशी ठरली आहे. अमेरिकेचे मुख्य उद्दिष्ट इराणची शासनव्यवस्था कमकुवत करणे आणि राष्ट्रीय एकता खंडित करणे होते, परंतु हे उद्दिष्ट साध्य झालेले नाही.

Follow Us
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
गणेशोत्सवासाठी कोकण जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या भाविकांसाठी CSMT वरून गणपती स्पेशल ट्रेन रवाना