19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींची निवडणूक, लवकरच कार्यक्रम जाहीर

| Updated on: Jan 15, 2021 | 7:48 PM

राज्यातील 1566 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर होणार, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी येथे केली (Election Commissioner will announces New Election schedule for 1566 Gram Panchayats of Maharashtra).

19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींची निवडणूक, लवकरच कार्यक्रम जाहीर
Follow us on

मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यभरातील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या कार्यक्रमाला स्थगित देण्यात आली होता. मात्र, आता या निवडणुकांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. निवडणूक आयोग या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर करणार आहे, अशी घोषणा राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज (19 नोव्हेंबर) केली (Election Commissioner will announces New Election schedule for 1566 Gram Panchayats of Maharashtra).

“राज्यातील 19 जिल्ह्यांतील 1 हजार 566 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 24 फेब्रुवारी 2020 रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार 31 मार्च 2020 रोजी मतदान होणार होते. मात्र, कोरोना संकटामुळे 17 मार्च 2020 रोजी उमेदवारी अर्ज छाननीच्या टप्प्यावर हा निवडणूक कार्यक्रम स्थगित करण्यात आला होता”, असं मदान म्हणाले.

“31 जानेवारी 2020 पर्यंत अद्ययावत केलेली विधानसभेच्या मतदार यादीवरून ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतदार याद्या तयार करण्यात आलेल्या होत्या. विधानसभेची ही मतदार यादी 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित होती. पण भारत निवडणूक आयोगाने आता 1 जानेवारी 2020 या अर्हता दिनांकावर आधारित अद्ययावत मतदार यादी 25 सप्टेंबर 2020 रोजी प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे नव्याने मतदार यादीत नाव नोंदविलेल्यांना निवडणूक लढविता यावी किंवा मतदान करता यावे म्हणून राज्य निवडणूक आयोगाच्या 5 फेब्रुवारी 2020 च्या आदेशान्वये ग्रामपंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेली मतदार यादीदेखील रद्द करण्यात आली आहे. परिणामी आता या निवडणुकांसाठी मतदार यादी आणि प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम नव्याने जाहीर केला जाणार आहे”, असं मदान यांनी सांगितलं.

एप्रिल, मे आणि जूनमध्ये महाराष्ट्रातील 1566 ग्रामपंचायतींची मुदत संपली आहे. या काळात या ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणे आवश्यक होते. ग्रामपंचायत निवडणुकीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रशिक्षणे, निवडणुकीचे कामकाज, प्रचारसभा, मेळावे आदींचे आयोजन केले जाते. लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. यातून कोरोनाचा मोठ्या प्रमाणात संसर्ग होण्याची शक्यता लक्षात घेऊन या ग्रामपंचायतींच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगामार्फत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

(Election Commissioner will announces New Election schedule for 1566 Gram Panchayats of Maharashtra)

हेही वाचा : 

PM Kisan Yojna : अद्याप 7.5 कोटी शेतकर्‍यांना 2 हजार रुपये मिळाले नाहीत, पैसे हवे असल्यास करा हे काम