PM Kisan Yojna : अद्याप 7.5 कोटी शेतकर्‍यांना 2 हजार रुपये मिळाले नाहीत, पैसे हवे असल्यास करा हे काम

मात्र सहाव्या हप्त्याचे 2 हजार रुपये केवळ 3.83 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात आले आहेत. (Pm Kisan Samman Nidhi Scheme Over 7 Crore Farmers Did Not Get Six Installment )

PM Kisan Yojna : अद्याप 7.5 कोटी शेतकर्‍यांना 2 हजार रुपये मिळाले नाहीत, पैसे हवे असल्यास करा हे काम

नवी दिल्लीः प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi Scheme) 7.5 कोटी शेतकर्‍यांना अद्याप सहाव्या हप्त्याचे 2 हजार रुपये मिळालेले नाहीत. पंतप्रधान किसान वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान योजनेंतर्गत एकूण 11.7 कोटी लाभार्थी नोंदणीकृत आहेत. मात्र सहाव्या हप्त्याचे 2 हजार रुपये केवळ 3.83 कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात आले आहेत. (Pm Kisan Samman Nidhi Scheme Over 7 Crore Farmers Did Not Get Six Installment )

पहिल्या हप्त्यात 10.26 कोटी शेतकर्‍यांना 2 हजार रुपये मिळाले होते. साडेसात कोटी शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे न आल्यानं त्यांनी दिलेल्या माहितीत चुका असू शकतात, असाही अंदाज बांधला जात आहे. जर आपण पंतप्रधान किसान योजनेंतर्गत आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यात काही चूक केली असल्यास आपले पैसे थांबू शकतात. म्हणून पण शक्य तितक्या लवकर आपल्या नोंदी दुरुस्त कराव्यात.

पीएम किसान हप्ता वर्षातून तीन वेळा येतो खात्यात

वर्षाकाठी तीन वेळा शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार रुपये वर्ग केले जातात. पहिला हप्ता – एप्रिल ते जुलै, दुसरा हप्ता – ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि तिसरा हप्ता – डिसेंबर ते मार्च या दरम्यान खात्यात जमा होतो.

अशा प्रकारे आपली चूक दुरुस्त करावी

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजने pmkisan.gov.in च्या अधिकृत संकेतस्थळावर लॉग इन करा. त्यामध्ये दिलेल्या ‘फार्मर्स कॉर्नर’ टॅबवर क्लिक करा. ‘फार्मर कॉर्नर’ वर क्लिक केल्यानंतर बेनिफिकरी स्टेटसवर क्लिक करा. त्यानंतर तेथे आधार क्रमांक, खाते क्रमांक आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल. आपली माहिती बरोबर आहे की नाही हे येथे आपण तपासू शकता. जर ती चुकीचे असेल तर ती दुरुस्त केली जाऊ शकते. (Pm Kisan Samman Nidhi Scheme Over 7 Crore Farmers Did Not Get Six Installment )

अलीकडेच नोंदणी केली असल्यास स्थिती जाणून घ्या

जर आपण अलीकडेच पीएम किसान योजनेंतर्गत नोंदणी केली असेल तर आपण आपल्या अर्जाची स्थिती देखील तपासू शकता. त्यासाठी ‘Farmers Corner’ च्या खाली सेल्फ रजिस्टर्ड / सीएससी फार्मर या पर्यायावर क्लिक करा. या अंतर्गत, आधार नंबरनंतर आपण कॅप्चा कोड प्रविष्ट करा आणि ‘शोध’ बटणावर क्लिक करा. नवीन पृष्ठावर आपल्याला नोंदणीसाठी देण्यात आलेल्या अर्जाची स्थिती सापडेल.

 

संबंधित बातम्या

कृषी योजनांच्या माहितीसाठी आता व्हॉटस्ॲप आणि ब्लॉगचा वापर : कृषिमंत्री दादाजी भुसे

पगाराला हात न लावता गुंतवणुकीचा सोपा आणि भन्नाट मार्ग, जबरदस्त फायदा शक्य

(Pm Kisan Samman Nidhi Scheme Over 7 Crore Farmers Did Not Get Six Installment )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *