AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

LPG Gas Cylinder नेहमी लाल रंगाचे का असते? हिरवे, पिवळे, निळे का नसते?

LPG Cylinder Colour Meaning: सध्या गॅस टंचाईने ग्राहक हैराण आहेत. अनेक ठिकाणी बुकिंग केल्यावरही ओटीपी येत नसल्याने ग्राहकांनी थेट एजन्सीसमोर ठिय्या सुरू केल्याचे दिसते. गॅस सिलेंडर हे घरातील किचनचे अविभाज्य भाग झाले आहे. पण गॅस टाकी नेहमी लाल रंगाचीच का असते? ती निळी, पिवळी अथवा हिरव्या रंगाची का नसते? काय आहे त्यामागील कारण?

LPG Gas Cylinder नेहमी लाल रंगाचे का असते? हिरवे, पिवळे, निळे का नसते?
गॅस सिलेंडरचा रंग लालच काImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 28, 2026 | 3:09 PM
Share

Why Are Gas Cylinders Are Red: सध्या गॅस सिलेंडरसाठी अनेक ग्राहकांना मोठी कसरत करावी लागली. भल्या पहाटे उठून एजन्सीबाहेर उभे राहावे लागले. गॅस टंचाईचा सामना करावा लागला. बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसल्याने गॅस एजन्सीबाहेर ग्राहकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसते. गॅस सिलेंडर हे स्वयंपाकगृहातील अविभाज्य भाग झाले आहे. पण गॅस सिलेंडर हे नेहमी लाल रंगाचेच का असते? ते हिरवे, पिवळे आणि इतर रंगाचे का नसते? असा प्रश्न तुम्हालाही पडला आहे का? काय आहे त्याचे उत्तर?

लाल रंगाचाच सिलेंडर का?

Gas Cylinder हा नेहमी लाल रंगाचाच का असतो, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. अनेक रंगाचा वापर हा खास कारणांसाठी करण्यात येतो. पांढरा रंग हा शांततेचं प्रतिक मानल्या जातो. तर हिरवा रंग हा सृष्टीचं हिरवगार पांघरूण आहे. निळ्या रंगात आकाशाची नवलाई दडली आहे. तर लाल रंग हा धोक्याची सूचना देतो. LPG म्हणजे लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस हा एक ज्वलनशील पदार्थ आहे. थोडाही निष्काळीजपणा मोठ्या दुर्घटनेला आमंत्रण देऊ शकतो. त्यामुळे हा धोका ओळखून सिलेंडरला लाल रंग देण्यात येतो. विशेष म्हणजे गडद लाल रंग धूरात आणि अंधारातही चमकून उठतो. तो दुरून दिसतो. आपत्कालीन स्थितीत लाल रंगाचा सिलेंडर सहज नजरेस पडतो. त्यामुळे गॅसची टाकी ही लाल रंगात न्हाऊन निघते.

इतर सिलेंडरला कोणता रंग?

जगभरात विविध गॅससाठी वेगवेगळ्या रंगाचे सिलेंडर असतात. त्यामुळे ते ओळखणं सोपं जातं. ओळखण्यात कोणतीच गल्लत होऊ नये यासाठी हा रंग देण्यात येतो. या प्रक्रियेला कलर कोंडिंग असे म्हणतात. जर सर्वच गॅस सिलेंडर एकाच रंगाचे असते तर त्यांना ओळखणे कठीण गेले असते आणि कदाचित त्याच्या वापरामुळे एखादी मोठी दुर्घटनाही घडली असती. त्यामुळे रंगाप्रमाणेच गॅस टॅकीचे वजन, त्यातील गॅस, टाकीचा आकार यामध्ये सुद्धा विविधता असते. व्यावसायिक आणि घरगुती गॅसमध्ये ठळक फरक दिसतो. तर इतर गॅस टाकीमध्ये सुद्धा फरक उठून दिसतो.

पांढऱ्या रंगाचा वापार हा ऑक्सिजन सिलेंडरसाठी करण्यात येतो

निळ्या रंगाचा वापर हा नाईट्स ऑक्साईडसाठी करण्यात येतो

काळ्या रंगाच्या सिलेंडरमध्ये नायट्रोजन गॅस असतो

लाल रंग हा ज्वलनशील आणि धोकादायक पेट्रोलियम गॅससाठी वापरल्या जातो

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?