AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इराण अमेरिका युद्धात हा देश मैदानात? थेट गंभीर आरोप, उपग्रहण फोटोच..

इराण आणि अमेरिका युद्धाला एक महिना आज पुर्ण झाला आहे. पण हे युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. यादरम्यानच आता अत्यंत झोप उडवणारी माहिती पुढे येत आहे. अत्यंत गंभीर आरोप यादरम्यान रशियावर करण्यात आली.

इराण अमेरिका युद्धात हा देश मैदानात? थेट गंभीर आरोप, उपग्रहण फोटोच..
Saudi Prince Sultan airbase attack
| Updated on: Mar 29, 2026 | 9:52 AM
Share

इराण आणि अमेरिका युद्धाला आज एक महिना पूर्ण झाला. या एक महिन्यात जगाने खूप काही सहन केले. कोणत्याही परिस्थितीमध्ये युद्ध तात्काळ थांबवावे, अशी मागणी केली जात आहे. इराणकडून साैदीच्या प्रिंस सुलतान एअरबेसवर मोठा हल्ला करण्यात आला. या हल्ल्याने खळबळ उडाली. हैराण करणारे म्हणजे दहापेक्षा अधिक अमेरिकी सैनिक या हल्ल्यात जखमी झाले. हा हल्ला म्हणजे अमेरिकेसाठी अत्यंत मोठा धक्का म्हणावा लागेल. यादरम्यानच आता रशियावर गंभीर आरोप करण्यात आले. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर जेलेंस्की यांनी मोठा दावा केला. जेलेंस्की यांनी केलेल्या दाव्यानंतर एकच खळबळ उडाली.जेलेंस्की यांनी म्हटले की, या हल्ल्यापूर्वी रशियाकडून साैदीच्या एअरबेसचे उपग्रह फोटो अनेकदा घेण्यात आले आणि ही माहिती इराणला देण्यात आली.

युक्रेनच्या या दाव्यानंतर तणाव अधिक वाढला. जेलेंस्की यांच्या म्हणण्यांनुसार, युक्रेनच्या गुप्तचर एजन्सीच्या दाव्यानुसार, रशियाने प्रिंस सुलतान एअरबेसचे 20, 23 आणि 25 मार्चला फोटो घेतले होते. त्यानंतर बरोबर एक दिवसानंतर अर्थात 26 मार्चला इराणने या एअरबेसवर मोठा हल्ला केला. इराणकडून याठिकाणी बेलिस्टिक मिसाईल टाकण्यात आली.

यामध्ये अमेरिकेच्या विमानांचे मोठे नुकसान झाले असून थेट त्यांचे सैनिकही गंभीर जखमी झाले आहेत. हा एअरबेस अमेरिकेच्या सैन्यांसाठी अत्यंत महत्वाचा असून त्यालाच टार्गेट करत इराणकडून हल्ला करण्यात आला. युक्रेनने म्हटले की, रशियाकडून या एअरबेसचे वारंवार सॅटलाईट फोटो घेतले होते. यावर थेटपणे संकेत मिळत आहेत, की इराणला रशियाने मदत केली.

मात्र, युक्रेनने केलेल्या आरोपांवर रशियाने अजून भाष्य केले नाही, पण या दाव्यानंतर खळबळ उडाली. अमेरिकेनेही काही दिवसांपूर्वी आरोप करत म्हटले होते की, रशियाला इराणला मदत करत आहे. पण त्यावर रशियाने स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामध्ये युक्रेनकडून अत्यंत गंभीर आरोप रशियावर करण्यात आला. या युद्धात अमेरिकेची कोणीही मदत करत नाहीये. पण काही देश प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे इराणची मदत सुरूवातीपासूनच करत असल्याचे बघायला मिळतंय.

Follow Us
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता..
तुटलेल्या खिडक्यांवर उपमुख्यमंत्र्यांचे बॅनर अन्... अभिजीत दीपके आता अगामी मोर्च्यावर
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत..
आता ओमराजेंचे निकटवर्तीय... राजकीय हालचाली वाढल्या? ऑपरेशन टायगरबाबत बड्या मंत्र्याचं मोठं विधान
पुन्हा ठाकरेंचे आमदार...फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या सोहळ्यात
पुन्हा ठाकरेंच्या आमदारांची चर्चा! फडणवीसांच्या हस्ते ध्वजारोहण होणाऱ्या कार्यक्रमात ठाकरेंच्या आमदाराची हजेरी
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... मोठी खळबळ
तुम्ही गुपचूप सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांना भेटून... शिवसेना निकालाआधीच बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचे पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर...
मोठी बातमी! CJI सुर्यकांत यांचं पुन्हा 'कॉक्रोच'बाबतच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण, अखेर म्हणाले...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिन...
विकसित भारताच्या वाटचालीत महाराष्ट्र ठरणार गेमचेंजर; स्वातंत्र्यदिनाच्या भाषणादरम्यान CM नेमकं काय म्हणाले?
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी..
पंतप्रधानांचं नागरिकांना मोठं आवाहन! जागतिक स्तरावर निर्यात वाढीसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी...
लाल किल्ल्यावरुन पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा! तरुणांसाठी... 'या' क्षेत्रात होणार बदल
पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
Independence Day 2026 | पंतप्रधान मोदींकडून राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण
स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi : स्वप्न मोठी असतील तर आपलं सामर्थ्यही वाढतं, पंतप्रधान मोदींकडून भारताच्या प्रगतीवर भर