AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

NEET-UG बाबत मोठी बातमी, अर्ज भरण्यासाठी आता… जाणून घ्या अपडेट

नीट यूजी 2026 साठी अर्ज करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ने NEET UG 2026 च्या ऑनलाइन रजिस्ट्रेशनची अंतिम तारीख वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ज्यांनी अद्याप अर्ज केला नाही, त्यांना आणखी थोडा वेळ मिळाला आहे.

NEET-UG बाबत मोठी बातमी, अर्ज भरण्यासाठी आता... जाणून घ्या अपडेट
NEET UG 2026
| Updated on: Mar 09, 2026 | 2:48 PM
Share

वैद्यकीय क्षेत्रात करिअर करण्याची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने NEET UG 2026 साठी ऑनलाइन नोंदणीची अंतिम तारीख 11 मार्च 2026 पर्यंत वाढवली आहे. तांत्रिक अडचणी किंवा इतर कारणांमुळे अनेक उमेदवारांना अर्ज पूर्ण करता आला नव्हता, याची दखल घेत हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे देशातील प्रतिष्ठित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये MBBS, BDS आणि इतर मेडिकल कोर्सेसमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. एनटीएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि अधिकृत वेबसाइटद्वारे ही माहिती जाहीर केली आहे.

NEET UG 2026 साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आता 11 मार्च 2026 पर्यंत सुरू राहणार आहे. यापूर्वी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 08 मार्च पर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र उमेदवारांची वाढती मागणी आणि रजिस्ट्रेशन पोर्टलवर वाढलेली गर्दी लक्षात घेऊन ही अंतिम तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उमेदवार आता अधिकृत पोर्टलवर जाऊन आपल्या क्रेडेन्शियल्सने लॉगिन करून अर्ज भरू शकतात. मात्र लक्षात ठेवा, अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज प्रक्रिया पूर्ण मानली जाणार नाही. त्यामुळे 11 मार्चच्या अंतिम मुदतीपूर्वी फीचे पेमेंट आणि ट्रान्झॅक्शन पूर्ण करणे आवश्यक आहे.

NEET UG 2026 साठी अर्ज कसा करावा?

1. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in ला भेट द्या

2. होमपेजवरील ‘New Registration’ लिंकवर क्लिक करून बेसिक माहिती भरा

3. रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड मिळाल्यानंतर लॉगिन करा

4. अर्ज फॉर्ममध्ये शैक्षणिक पात्रता आणि वैयक्तिक माहिती नीट भरावी

5. त्यानंतर फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

6. शेवटी अर्ज शुल्क ऑनलाइन भरून कन्फर्मेशन पेज डाउनलोड करून ठेवावे

या गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

नीट यूजीसाठी अर्ज करताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. अर्ज भरताना ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर अचूक टाका, कारण पुढील सर्व माहिती आणि कम्युनिकेशन याच माध्यमातून पाठवले जाणार आहे. पासपोर्ट साईज फोटो आणि पोस्टकार्ड साईज फोटोचा बॅकग्राउंड पांढरा असणे आवश्यक आहे. तसेच स्वाक्षरी पांढऱ्या कागदावर काळ्या पेनने केलेली असावी. अर्ज भरताना जर काही चूक झाली तर भविष्यात NTA कडून ‘करेक्शन विंडो’ उघडली जाऊ शकते. मात्र शक्यतो पहिल्याच वेळी सर्व माहिती अचूक भरलेली असणे अधिक चांगले.

NEET UG मध्ये काय विचारलं जातं?

नीट यूजी ही भारतातील सर्वात मोठी वैद्यकीय प्रवेश परीक्षा मानली जाते. या परीक्षेद्वारे देशभरातील मेडिकल आणि डेंटल कॉलेजांमध्ये प्रवेश दिला जातो. NEET UG 2026 साठी स्पर्धा मोठ्या प्रमाणात असण्याची शक्यता आहे, कारण दरवर्षी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. ही परीक्षा पेन-अँड-पेपर मोडमध्ये घेतली जाणार आहे.

नीट यूजी परीक्षेत भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry) आणि जीवशास्त्र (Biology – Botany व Zoology) या विषयांमधून प्रश्न विचारले जातात. या तीन विषयांवर आधारित संपूर्ण प्रश्नपत्रिका तयार केली जाते आणि त्याच आधारावर विद्यार्थ्यांची गुणवत्ता तसेच गुणांकन निश्चित केले जातं.

Follow Us
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद
उद्धव ठाकरे उमेदवार नसल्याने मविआत नाराजी, भाजप या नाराजीचा घेणार फायद.
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर..
विधानपरिषदेची उमेदवारी मिळताच दानवेंचं मोठं विधान, म्हणाले मी त्यावर...
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम
मविआचं ठरलं! ठाकरे नाही तर उमेदवार कोण? आदित्य ठाकरेंनी सांगितला अंतिम.
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास...
आता रिक्षा चालकांना तीन महिन्यांची मुदत, मराठी न आल्यास....