AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असा डाऊनफॉल कधीच येऊ नये..; ‘आशिकी’ फेम राहुल रॉयची रील पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का

'आशिकी' या ब्लॉकबस्टर चित्रपटातील अभिनेता राहुल रॉय सोशल मीडियावर एका रीलमुळे चर्चेत आला आहे. राहुलच्या या रीलवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. हा त्याच्या करिअरमधील सर्वांत मोठा डाऊनफॉल असल्याची टीका नेटकरी करत आहेत.

असा डाऊनफॉल कधीच येऊ नये..; 'आशिकी' फेम राहुल रॉयची रील पाहून नेटकऱ्यांना बसला धक्का
Rahul RoyImage Credit source: Instagram
| Updated on: Apr 30, 2026 | 9:47 AM
Share

1990 मध्ये एक असा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. यातील दोन मुख्य कलाकार फिल्मी बॅकग्राऊंड नसतानाही पहिल्याच चित्रपटातून रातोरात स्टार बनले. परंतु पहिल्या चित्रपटाच्या जबरदस्त यशानंतर दोन्ही कलाकारांच्या करिअरची गाडी रुळावरून घसरली. हा चित्रपट होता ‘आशिकी’ आणि त्यामध्ये मुख्य भूमिका साकारल्या होत्या राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांनी. आता राहुल रॉय सोशल मीडियावर त्याच्या एका रीलमुळे चर्चेत आला आहे. ही रील पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला आहे. त्यावरील प्रतिक्रियांवरून हे सरळ स्पष्ट होत आहे की, नेटकरी ‘आशिकी’ स्टारच्या या व्हिडीओवर पूर्णपणे नाखुश आहेत. असा कोणता नाईलाज होता, असा सवाल नेटकऱ्यांनी राहुलला केला आहे.

राहुल रॉय यांच्यासोबतची ही रील डॉ. वनिता घाडगे नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये राहुल त्या महिलेसोबत त्याच्याच लोकप्रिय गाण्यावर नाचताना आणि अभिनय करताना दिसत आहे. ‘आशिकी’च्या गाण्यांवर राहुल रॉय आणि वनिता घाडगे यांचे इतके रील्स आहेत, जे बघायलाही नेटकऱ्यांना खूप विचित्र वाटत आहे. कारण या व्हिडीओमध्ये राहुलच्या चेहऱ्यावर विचित्र हावभाव तर आहेतच, पण तो रील शूट करताना संबंधित महिलेसमोर संकोचल्यासारखाही दिसत आहे. एकीकडे ती महिला त्याच्या आजूबाजूला नाचतेय, फिरतेय आणि प्रेम व्यक्त करतेय, तर दुसरीकडे राहुल तिच्यासमोर एखाद्या पुतळ्यासारखा स्तब्ध आणि चेहऱ्यावर कोणत्याही हावभावाशिवाय उभा आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.

‘या रीलमध्ये राहुल रॉयला नशेचं औषध दिलं असेल, जसं थायलँडमध्ये वाघांसोबत करतात’, असा उपरोधिक टोला एका युजरने लगावला. तर ‘मला असं वाटतंय की ती महिला त्यांच्या कपड्यांचं माप घेत असावी’, अशी खिल्ली दुसऱ्याने उडवली. ‘राहुल रॉयचा असा कोणता नाईलाज होता, ज्यामुळे त्याने या रीलला होकार दिला’, असा उपरोधिक सवाल एका युजरने केला आहे. तर असा डाऊनफॉल कधीच येऊ नये, असंही काहींनी म्हटलं आहे.

‘आशिकी’ या चित्रपटानंतर राहुलचा स्टारडम तुफान वाढला होता. सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा होती आणि त्याला अनेक चित्रपटांचे ऑफर्स मिळू लागले होते. परंतु ‘आशिकी’सारखी जादू त्याला पुन्हा पडद्यावर दाखवता आली नाही. हळूहळू तो प्रकाशझोतापासून दूर गेला आणि चित्रपटांमध्ये कमी झळकू लागला.  राहुलने बिग बॉसच्या पहिल्या सिझनमध्ये भाग घेतला होता आणि त्याचं विजेतेपदही त्याने पटकावलं होतं. त्यानंतर 2020 मध्ये त्याला ब्रेक स्ट्रोक आला होता. आरोग्याच्या या गंभीर समस्येवर राहुलने यशस्वीरित्या मात केली.

Follow Us
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे...
सह्याद्रीवर धुक्याची चादर, दऱ्याखोऱ्यात धबधबे; ‘मिसिंग लिंक’चं हे दृश्य पाहाच!
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं....
संजय राऊतांवर अमृता फडणवीस संतापल्या, थेट म्हणाल्या राऊतांसारखं बरळण्यापेक्षा...
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. डी. वाय. पाटील यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया...
शिवसेना चिन्हाबाबतच्या सुनावणीनंतर शिंदे गटाकडून पहिली प्रतिक्रिया समोर, एका वाक्यातच...
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी
मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडीओ Delete केल्याप्रकरणी अखेर Metaने मागितली माफी, पहा व्हिडीओ
वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळ
Walmik Karad | वाल्मिक कराड पुन्हा चर्चेत, राष्ट्रवादीतील बड्या नेत्याच्या ट्वीटने खळबळ
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत?
शिवसेना कुणाची? कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद; शिंदे गट अडचणीत? सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर राऊतांचा मोठा दावा
Sanjay Raut On SC Hearing | शिंदे गटाचे सर्व आमदार अपात्र ठरणार?; सुनावणीनंतर संजय राऊतांचा मोठा दावा
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात...
शिवसेना कुणाची? जोरदार युक्तावादनंतर आजची सुनावणी संपली, कोर्टात नेमकं काय घडलं?
कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून...
Kunbi Certficate | कुणबी प्रमाणपत्र अवैध, मराठा समाजाच्या... छत्रपती संभाजीनगरातून मोठी अपडेट समोर!