AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

West Bengal Exit Poll | पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात, कमळ फुलणार?

West Bengal Exit Poll | पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात, कमळ फुलणार?

| Updated on: Apr 29, 2026 | 9:01 PM
Share

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठी राजकीय घडामोड समोर येत आहे. शेवटच्या टप्प्याचे मतदान पार पडताच विविध संस्थांचे एक्झिट पोल जाहीर झाले असून, यामध्ये राज्यात मोठा उलटफेर होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. या अंदाजांनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का बसू शकतो, तर भाजप सत्तेच्या जवळ पोहोचत असल्याचे चित्र आहे.

एकूण 294 जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधी समोर आलेल्या एक्झिट पोलच्या आकडेवारीने राजकीय वातावरण तापले आहे. मॅट्रिझच्या एक्झिट पोलनुसार तृणमूल काँग्रेसला 125 ते 140 जागा मिळण्याचा अंदाज असून, भाजपला 146 ते 161 जागा मिळू शकतात. चाणक्यच्या सर्वेक्षणातही भाजपला 150 ते 160 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर तृणमूल काँग्रेस 130 ते 140 जागांपर्यंत मर्यादित राहू शकते.
तसेच इतर काही सर्वेक्षणांमध्ये तृणमूल काँग्रेसला आणखी कमी जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोल डायरीच्या अंदाजानुसार तृणमूल काँग्रेसला 99 ते 127 जागा मिळू शकतात, तर भाजपला 142 ते 171 जागांपर्यंत मजल मारता येऊ शकते. दुसरीकडे, ‘पोल ऑफ पोल्स’मध्ये दोन्ही पक्षांमध्ये अत्यंत चुरशीची लढत दिसून येत असून भाजपला 143 आणि तृणमूल काँग्रेसला 144 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या सर्व अंदाजांमुळे पश्चिम बंगालमध्ये सत्तांतर होण्याची शक्यता बळावली आहे. 2011 पासून सलग सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाला यावेळी मोठे आव्हान उभे ठाकल्याचे चित्र आहे. एक्झिट पोलचे अंदाज प्रत्यक्ष निकालात खरे ठरतात की पुन्हा एकदा उलटफेर होतो, हे 4 मे रोजी स्पष्ट होणार आहे.

Published on: Apr 29, 2026 09:01 PM
Follow Us