Tamil Nadu Exit Poll | तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK पुन्हा सत्तेत, भाजप-AIADMK पिछाडीवर
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले असून, आता एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी डीएमके (DMK) पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील होता, तर एआयएडीएमके (AIADMK) आणि भाजप युतीसह अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षानेही जोरदार लढत दिली. 234 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. दरम्यान, समोर आलेल्या एक्झिट पोल्सनुसार डीएमके आणि त्यांच्या मित्रपक्षांना स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
तामिळनाडू विधानसभा निवडणुकीसाठी नुकतेच मतदान पार पडले असून, आता एक्झिट पोलचे आकडे समोर येऊ लागले आहेत. या निवडणुकीत सत्ताधारी डीएमके (DMK) पक्ष सलग दुसऱ्यांदा सत्तेत येण्यासाठी प्रयत्नशील होता, तर एआयएडीएमके (AIADMK) आणि भाजप युतीसह अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके (TVK) पक्षानेही जोरदार लढत दिली. 234 जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान पार पडले होते. दरम्यान, समोर आलेल्या एक्झिट पोल्सनुसार डीएमके आणि त्यांच्या मित्रपक्षांना स्पष्ट आघाडी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मॅट्रिक्झच्या एक्झिट पोलनुसार, डीएमके आघाडीला 122 ते 132 जागा मिळू शकतात, तर भाजप-एआयएडीएमके युतीला 87 ते 110 जागा मिळण्याचा अंदाज आहे. अभिनेता थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला 10 ते 12 जागा मिळण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे, तर इतर पक्षांना 0 ते 6 जागा मिळू शकतात.
याशिवाय, पीपल्स प्लसच्या एक्झिट पोलनुसार डीएमके आघाडी आणखी मजबूत स्थितीत दिसत असून, त्यांना 125 ते 145 जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, एआयएडीएमके-भाजप युतीला 65 ते 80 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर टीव्हीकेला 18 ते 24 जागा मिळू शकतात. इतर पक्षांना 2 ते 6 जागा मिळण्याची शक्यता आहे. 234 सदस्यांच्या तामिळनाडू विधानसभेत बहुमतासाठी 118 जागांची आवश्यकता असते. एक्झिट पोल्सच्या अंदाजानुसार डीएमके हा बहुमताचा आकडा सहज पार करू शकतो. त्यामुळे सध्याचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन पुन्हा एकदा सत्तेवर येण्याची शक्यता बळावली आहे.
एकूणच, या एक्झिट पोल्समुळे डीएमकेसाठी सकारात्मक चित्र दिसत असताना, भाजप-एआयएडीएमके युती आणि थलपती विजय यांच्या टीव्हीके पक्षाला अपेक्षेपेक्षा कमी यश मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अंतिम निकालानंतरच तामिळनाडूतील सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?

